AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

आयटी विभागाने 21.32 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 13,694 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. त्याचबरोबर 1,19,173 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 32,203 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय.

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?
तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 08, 2021 | 3:19 PM
Share

नवी दिल्ली: तुम्हीही आयकर परताव्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल ते 2 ऑगस्टदरम्यान 21.32 लाख करदात्यांना सुमारे 45,896 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. आयकर विभागाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. आयटी विभागाने 21.32 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 13,694 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. त्याचबरोबर 1,19,173 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 32,203 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय.

32,203 कोटी 1,19,173 कॉर्पोरेट कर प्रकरणांमध्ये परतावा जारी

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ट्विट करून ही माहिती दिली. ट्विटमध्ये लिहिले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 02 ऑगस्ट 2021 दरम्यान 21.32 लाखांहून अधिक करदात्यांना 45,896 कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी केला. 13,694 कोटी 20,12,802 प्रकरणांमध्ये आणि 32,203 कोटी 1,19,173 कॉर्पोरेट कर प्रकरणांमध्ये जारी करण्यात आलेत.

आपणही स्थिती तपासू शकता

सीबीडीटीने आयकर कायदा 1961 अंतर्गत विविध फॉर्म इलेक्ट्रॉनिक भरण्याची अंतिम तारीख वाढवली. ही रक्कम करदात्याच्या खात्यावर पाठवण्यात आली. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे शोधण्यासाठी तुम्ही स्थिती तपासू शकता.

आयकर परताव्याची स्थिती तपासण्याचे मार्ग

1. NSDL च्या वेबसाईटवर तपासा- >> तुम्ही www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर तुमची परताव्याची स्थिती ऑनलाईन तपासू शकता. >> यापैकी कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करा आणि कर परताव्याची स्थिती टॅबवर क्लिक करा. >> ज्या वर्षासाठी परतावा प्रलंबित आहे, त्या वर्षासाठी तुमचा पॅन नंबर आणि मूल्यांकन वर्ष प्रविष्ट करा. >> जर विभागाने परताव्याची प्रक्रिया केली असेल तर तुम्हाला पैसे देण्याची पद्धत, संदर्भ क्रमांक, स्थिती आणि परताव्याची तारीख नमूद करणारा मेसेज मिळेल. >> जर परताव्याची प्रक्रिया केली गेली नसेल किंवा दिली गेली नसेल तर तोच मेसेज येईल.

2. ई-फायलिंग पोर्टलवर या मार्गाने तपासा-

>> येथे क्लिक करून प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये प्रविष्ट करा. >> परतावा / फॉर्म पाहा. >> माझे खाते टॅबवर जा आणि आयकर परतावा निवडा. >> सबमिटवर क्लिक करा. >> पावती क्रमांकावर क्लिक करा. >> आयकर परताव्याच्या स्थितीसह आपले विवरण तपशील दर्शविणारे एक पृष्ठ दिसेल.

कर परतावा म्हणजे काय?

आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्याच्या अंदाजित गुंतवणूक दस्तऐवजाच्या आधारावर आगाऊ रक्कम कापली जाते. परंतु जेव्हा त्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम कागदपत्रे सादर केली, तर त्याचा कर अधिक कापला गेला आणि त्याला आयकर विभागाकडून पैसे परत हवे असल्यास परताव्यासाठी आयटीआर दाखल करू शकतो.

संबंधित बातम्या

IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या, 10 ऑगस्टला होणार निर्णय

तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार

45,896 crore refund issued by Income Tax Department, did you get the money in your account or not?

Follow Us
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं