1 लिटर खाद्यतेल खरेदी करत असाल तर तुमचीही होतेय फसवणूक, प्रत्यक्ष वजन वाचून बसेल धक्का

Cooking Oil: तुमच्यापैकी अनेकजण बाजारातून एक लिटरचे खाद्यतेलाचे पॅकेट खरेदी करत असाल. मात्र हे तेल खरेदी करताना दररोज लाखो ग्राहकांची फसवणूक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

1 लिटर खाद्यतेल खरेदी करत असाल तर तुमचीही होतेय फसवणूक, प्रत्यक्ष वजन वाचून बसेल धक्का
cooking oil
| Updated on: Nov 03, 2025 | 7:26 PM

तुमच्यापैकी अनेकजण बाजारातून एक लिटरचे खाद्यतेलाचे पॅकेट खरेदी करत असाल. मात्र हे तेल खरेदी करताना दररोज लाखो ग्राहकांची फसवणूक होत आहे. तुम्ही जेव्हा त्या पॅकेटकडे पाहता तेव्हा ते अर्ध्या लिटरच्या पॅकसारखे किंवा एक लिटरच्या पॅकसारखे दिसतात. मात्र तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, अर्ध्या लिटरच्या पॅकेटमघ्ये केवळ 350 ग्रॅम ते 450 ग्रॅम तेल असू शकते. तसेच एक लिटरच्या पॅकेटमध्ये प्रत्यक्षात 750 ग्रॅम ते 950 ग्रॅम तेल असते. यामुळे एक लिटर तेल खरेदी करताना आपल्याला कमी प्रमाणात तेल मिळते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तेलाच्या पॅकेटवर त्यात असलेल्या तेलाचे वजन लिहिलेले असते. मात्र सर्व ग्राहक यात एक लिटर तेल आहे असं समजून पैसे देतात. खाद्यतेल कंपन्या अधिक नफा मिळविण्यासाठी पॅकेटचे वजन कमी करतात. यामुळे तेल कंपन्यांमध्ये तेलाच्या किंमतीबाबत स्पर्धा पहायला मिळते. 810 ग्रॅम तेलाच्या पॅकची किंमत 900 ग्रॅमच्या पॅकपेक्षा कमी असते. मात्र या दोन्हीचे पॅकेट जवळपास सारखेच दिसते. मात्र 810 ग्रॅम वजन असलेल्या पॅकेटची किंमत कमी असते, त्यामुळे त्याची विक्री जास्त होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांनी कमी तेल मिळते.

खाद्यतेल लिटरमध्ये पॅक करण्याची मागणी

खाद्यतेल हे वजनामध्ये पॅक केले जाते, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. अशातच आता सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) या उद्योग संघटनेने अलीकडेच सरकारला एक पत्र लिहून कंपन्यांना लिटरने पॅक करणे बंधनकारक करण्याची मागणी केली आहे. यामुळे फसवणूकीला आळा बसेल असा या संघटनेचा विश्वास आहे.

कारण सध्या बाजारात 800 ग्रॅम, 810 ग्रॅम, 870 ग्रॅम सारख्या अ-मानकीकृत तेल पॅकची संख्या वाढत आहे. यामुळे ग्राहकांची गोंधळ उडत असून त्यांची फसवणूक होत आहे. तेल पॅकेटची साईज सारखीच दिसत असल्यामुळे ग्राहकांना कमी तेल दिले जाते. तसेच ज्याची किंमत कमी आहे ते पॅकेट लोक खरेदी करतात असं संघटनेने म्हटले आहे.

सर्व पॅकेटची साईज एकसारखी असते. त्यामुळे सरकारने स्वयंपाकाचे तेल लिटरमध्ये पॅक करणे बंधनकारक करावे, अशी मागणी एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेडच्या सीईओ अंशु मलिक यांनी केली. आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.