कोरोनाने अर्थव्यवस्थेला पोखरले; विकासदर 8 टक्क्याने घटणार, उद्योग, बांधकाम क्षेत्रालाही फटका

| Updated on: Mar 05, 2021 | 3:42 PM

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक सर्व्हे अहवाल आज विधानसभेत मांडला. या आर्थिक सर्व्हेतून राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. (Coronavirus-hit Maharashtra's economy to contract by 8% in FY21: Economic Survey)

कोरोनाने अर्थव्यवस्थेला पोखरले; विकासदर 8 टक्क्याने घटणार, उद्योग, बांधकाम क्षेत्रालाही फटका
अजित पवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र
Follow us on

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक सर्व्हे अहवाल आज विधानसभेत मांडला. या आर्थिक सर्व्हेतून राज्याच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अर्थिक सर्व्हेच्या अहवालातील अंदाजानुसार राज्याचा विकास दर 8 टक्क्याने घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उद्योग क्षेत्रात 11.3 टक्के, सेवा क्षेत्रात 9 टक्के, पायाभूत सुविधा क्षेत्रात 11.8 टक्के आणि बांधकाम क्षेत्रात 14.6 टक्क्याने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रात 11.7 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Coronavirus-hit Maharashtra’s economy to contract by 8% in FY21: Economic Survey)

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यानुसार 2019-20 च्या तुलनेत 2020-21च्या सांकेतिक स्थूल उत्पन्नात 1,56, 925 कोटी घट अपेक्षित आहे. चांगल्या मान्सूनमुळे कृषी व संलग्न क्षेत्रात 2020-21 मध्ये 11.7 वाढ अपेक्षित आहे. तर 2020-22 मध्ये उद्योग व सेवा क्षेत्रात अनुक्रमे 11.3 टक्के आणि 9.0 टक्के घट अपेक्षित आहे. म्हणजे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळ राज्यासाठी आर्थिक काटकसरीचाच असणार असल्याचं या आर्थिक पाहणी अहवालातून अधोरेखित झालं आहे.

राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहणार

या शिवाय राज्याचा स्थूल उत्पादनाचा वृध्दिकर (GDP) 8 टक्क्याने घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्याचा जीडीपी 5.7 टक्के आणि देशाचा 5 टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 2021-21 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याचं महसुली खर्चाचं प्रमाण 68.7 टक्के राहणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

परकीय गुंतवणूक समाधानकारक

वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 2020-21 ते 2025-26 करिता केंद्राकडून राज्याला 3,37,252 कोटी पैसे अपेक्षित आहे. त्यापैकी 70,375 कोटी सहाय्यक अनुदाने असतील, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2020 पर्यंत 37,887 कोटींच्या नवीन प्रकल्पांची नोंद झाली. 2020-21 सप्टेंबरपर्यंत राज्यात 27143 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली. 2019 मध्ये राज्यात 14.93 कोटी देशांअंतर्गत पर्यटक तर 55 लाख विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. जून 2020 पर्यंत राज्यात 1.13 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित त्यातून 2.5 लाखांपेक्षा जास्त रोजगार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

समृद्धी मार्ग सुसाट तर कोस्टल रोड सुस्त

समृद्धी महामार्गासाठी 92.3 टक्के जमीन भूसंपादीत करण्यात आली आहे. कोस्टल रोडचं काम 20 टक्के पूर्ण झालं आहे. एकात्मिक महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून 4.54 लाख शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यासाठी 744 कोटींचा खर्च आला आहे. राज्यात आतापर्यंत 7 लाख 81 हजार 800 कोव्हीड योध्यांना लस देण्यात आली असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (Coronavirus-hit Maharashtra’s economy to contract by 8% in FY21: Economic Survey)

 

संबंधित बातम्या:

आता चुकलात तर स्वस्तात घर, दुकान खरेदी करण्याची संधी हुकेल, आजपासून बंपर ऑफर

करदाते लक्ष द्या! 31 मार्चआधी उरकून घ्या ही कामं, नाहीतर द्यावा लागेल दंड

आता Cheque bounce करणं पडेल महागात, वाढत्या प्रकरणांमुळे कोर्टाचा मोठा निर्णय

(Coronavirus-hit Maharashtra’s economy to contract by 8% in FY21: Economic Survey)