24 तासात झरझर घसरला कच्चा तेलाचा भाव… इंधनाचे लवकरच अच्छे दिन? स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

Petrol Diesel Price Cheaper: जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव पुन्हा एकदा पाच टक्क्यांनी घसरले. त्यातच इराणवरील निर्बंध सैल झाल्याने कच्चा तेलाचे दर येत्या काही दिवसात अजून कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

24 तासात झरझर घसरला कच्चा तेलाचा भाव... इंधनाचे लवकरच अच्छे दिन? स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jun 23, 2026 | 10:18 AM

Crude Oil Price Down: जागतिक बाजारात सोमवारी सकाळी कच्चे तेलाच्या भावात 82 डॉलर प्रति बॅरलवर होते. तर त्यानंतर बाजार बंद होताना कच्चा तेलाचा भाव आपटला. कच्चे तेल थेट 76 डॉलर प्रति बॅरलवर आले. अमेरिका आणि इराणमधील ताज्या घडामोडींमुळे तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे. या सकारात्मक वातावरणामुळे देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. काही देशांनी त्यांच्या स्थानिक दरात कपात केल्याचा दावा करण्यात येत आहे. कच्चे तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरणीने सरकारी तेल कंपन्यांचा तोटा भरून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणला दोन महिन्यांची सवलत

इराणने अणूप्रकल्प बंद करण्याविषयी कोणती सहमती दर्शवलेली नाही. पण अमेरिकेचे उपराष्ट्रपतींनी इराणला तेल विक्रीसाठी दोन महिन्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे आता इराणचे तेल जगभरात पोहचेल. तर इतर देशांसाठी होर्मूझचा समुद्रधुनीही खुला झाला आहे. त्यामुळे आता बिनदिक्कतपणे जहाजांची ये जा सुरू असेल. त्यामुळे विस्कळीत पुरवठा साखळी सुरळीत होईल. या सर्व सकारात्मक घडामोडींमुळे कच्चा तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कच्चा तेलाच्या किंमती किती?

जागतिक बाजारात कच्चे तेलाचा भाव सोमवारी 3 टक्क्यांनी घसरला. मंगळवारी आखाती कच्चे तेल आणि अमेरिकन कच्चे तेलाच्या भावात कोणतीही वाढ दिसली नाही. आकडेवारीनुसार, सोमवारी कच्चा तेलाचा भाव 77.52 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता. तर व्यापारी सत्रादरम्यान हा भाव 76 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी आखाती देशात कच्चा तेलाचा भाव 77.72 डॉलर प्रति बॅरलवर आले.

गेल्या 24 तासात आखाती देशातील कच्चे तेलाचा भाव 5 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरला. अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयमध्ये घसरण झाली. सोमवारी हा भाव 73 डॉलर प्रति बॅरलवर आला. अमेरिकन कच्चा तेलाचा भाव 4.53 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. मंगळवारी वायदे बाजारात अमेरिकन कच्चा तेलाचा भाव जवळपास 74 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत होते. अमेरिकन कच्चा तेलाच्या भावात 5.50 टक्क्यांची घसरण दिसून आली.

पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त?

पेट्रोल आणि डिझेलच्या मोर्चावर अच्छे दिन येतील असे म्हटले जात आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत अजून मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनी सुद्धा याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. स्वस्त कच्चा तेलाची खेप पोहचताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण येण्याचे संकेत त्यांनी दिले. इराणचा समुद्रधूनी खुला होताच चार जहाजं कच्चं इंधन घेऊन भारताकडे झेपावली आहेत. लवकरच सरकारी तेल कंपन्यांचा तोटा भरून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नैसर्गिक वायूमध्ये कंपन्यांना रोज 600 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

Follow Us