Crypto Price : गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात! क्रिप्टोची मोठी झेप, बिटकॉईन, इथेरियमची जोरदार घोडदौड

| Updated on: Jan 17, 2023 | 7:49 PM

Crypto Price : क्रिप्टो करन्सीने बऱ्याच दिवसानंतर गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आणला आहे.

Crypto Price : गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात! क्रिप्टोची मोठी झेप, बिटकॉईन, इथेरियमची जोरदार घोडदौड
Follow us on

नवी दिल्ली : क्रिप्टो बाजारात (Cryptocurrency) अनेक दिवसानंतर चैतन्य पसरले आहे. जगातील सर्वात मोठं क्रिप्टो चलन बिटकॉईनने (Bitcoin) दमदार कामगिरी बजावली आहे. बिटकॉईन सातत्याने मजबूत होत आहे. क्रिप्टोची बाजारातील वाटा 41 टक्क्यांच्याही पुढे गेली आहे. बिटकॉईन बाजाराने 21 हजार डॉलरचा टप्पा पार केला आहे. बिटकॉईनमध्ये सध्या 1.74 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. बिटकॉईनचा सध्याचा भाव 21,165.28 डॉलर (17.30 लाख ) इतका आहे. तर क्रिप्टोचे दुसरे चलन इथेरियममध्ये (Ethereum) पण एक टक्क्यांची वाढ झाली आहे. इथेरियमचा भाव सध्या 1500 डॉलरच्या पुढे आहे.

बाजारातील भांडवलानुसार, टॉप-10 क्रिप्टोमध्ये टेथरने (Tether) गुंतवणूकदारांना निराश केले आहे. या क्रिप्टोच्या भावात कसलाच बदल झालेला नाही. संपूर्ण क्रिप्टो बाजाराचा आढावा घेतला असता, गेल्या 24 तासांत त्यात तेजीचे वारे आले आहे. त्यात आणखी वाढीचा अंदाज आहे.

गेल्या 24 तासांत क्रिप्टो चलनात, जागतिक मार्केट कॅपमध्ये 1.10 टक्क्यांची तेजी आली आहे. हा बाजार 98.96 हजार कोटी डॉलर (80.90 लाख कोटी रुपये) वर पोहचला आहे. बिटकॉईन आणि इथेरियमसोबतच बीएनबी, युएसडी कॉईन, एक्सआरपी, बाईनेंस युएसडी. कार्डानो, डॉजकॉईन, पॉलीगॉन या चलनात थोडीफार वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सात दिवसांपासून बिटकॉईन सातत्याने मजबूत होत आहे. बिटकॉईन जवळपास 23 टक्क्यांनी वाढला आहे. तर बाजारातील दुसरे चलन इथेरियममध्ये एका आठवड्यात जवळपास 18 टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात क्रिप्टोच्या देवाण-घेवाणीत घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (ShaktiKant Das on Cryptocurrency) यांनी मोठे वक्तव्य केले होते. क्रिप्टोकरन्सी जुगार असल्याचे ते म्हणाले. दास यांनी क्रिप्टोकरन्सीवर संपूर्ण बंदी आणण्याचे आवाहन पुन्हा केले.

क्रिप्टोकरन्सीला किंमत असल्याचा दावा संपूर्णपणे खोटा आहे. क्रिप्टोकरन्सी हा एक जुगार (Gambling) आहे . त्याव्यतिरिक्त हे दुसरे काहीच नसल्याचे ते म्हणाले.क्रिप्टोकरन्सी अत्यंत धोकादायक असल्याचा त्यांनी दावा केला. या चलनाची किंमत वाढताना दिसत असली तरी ते शंभर टक्के खोटं असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.