18 नोव्हेंबरला येणार 456 कोटी रुपयांचा IPO! कमाईची मोठी संधी; जाणून घ्या इश्यू प्राइज
18 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या एका आयपीओने शेअर बाजारात कमाई करण्याची आणखी एक संधी आली आहे. या IPO ची इश्यू प्राइज जाणून घ्या.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी असून नोव्हेंबर महिन्यात आणखी एक आयपीओ (IPO) येणार आहे. पीक संरक्षण आणि कृषीविषयक उपाययोजनांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली ‘क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड’ (Crystal Crop Protection Limited) ही कंपनी ४५६ कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. कंपनीने प्रति शेअर २५९ ते २७२ रुपयांची किंमत श्रेणी निश्चित केली आहे. हा आयपीओ १८ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होईल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कृषी क्षेत्रातील या कंपनीत हिस्सा मिळवण्याची संधी मिळणार आहे.
IPO सुरू होण्यापूर्वी जाणून घेण्यासारखे महत्त्वाचे तपशील
IPO सुरू होण्याची तारीख: १८ नोव्हेंबर, २०२६
IPO बंद होण्याची तारीख: २० नोव्हेंबर, २०२६
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया: १७ नोव्हेंबर, २०२६
किंमत श्रेणी (Price Band): प्रति शेअर ₹२५९ ते ₹२७२
एकूण इश्यू आकार: ₹४५६ कोटी
लिस्टिंग: BSE आणि NSE वर प्रस्तावित
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडचा IPO दोन भागात विभागलेला आहे. यामध्ये 355 कोटी रुपयांपर्यंत नवीन शेअर्सची विक्री होईल आणि बाकीचे१०१ कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सची विक्री (Offer for Sale – OFS) यांचा समावेश आहे. नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळणारी रक्कम कंपनीला मिळेल, तर ओएफएस (OFS) द्वारे विकल्या गेलेल्या शेअर्समधून मिळणारी रक्कम शेअर होल्डर्सला मिळेल.
कशासाठी वापरणार रक्कम?
कंपनी नवीन शेअर्सची विक्रीतून मिळणारी रक्कम स्वतःचे कर्ज तसेच तिची उपकंपनी ‘सॅफायर क्रॉप सायन्स’ (Sapphire Crop Science) चे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. याव्यतिरिक्त, निधीचा काही भाग अधिग्रहणांसाठी आणि धोरणात्मक वाढीच्या संधींसाठी वापरला जाईल. उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामनासाठी खर्च केली जाईल.