गव्हापाठोपाठ पिठाच्याही किंमती उच्चांकी पातळीवर 12 वर्षात किंमती दुप्पट

| Updated on: May 09, 2022 | 11:24 AM

देशातील गव्हाच्या किंमती गेल्या 12 वर्षांत दुप्पट झाल्या आहेत. जानेवारी 2010 मध्ये गव्हाच्या पिठाच्या किंमती प्रति किलो 17 ते 18 रुपये होत्या. या एप्रिल महिन्यात किंमती प्रति किलो तब्बल 32.38 रुपयांवर पोहचल्या आहेत. पिठाच्या किंमतीत झालेली ही प्रचंड वाढ सामान्य ग्राहकांच्या मुळावर आली आहे.

गव्हापाठोपाठ पिठाच्याही किंमती उच्चांकी पातळीवर  12 वर्षात किंमती दुप्पट
10 वर्षांत किंमती कितीने वाढल्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

देशातील गव्हाच्या किंमती गेल्या 12 वर्षांत दुप्पट झाल्या आहेत. जानेवारी 2010 मध्ये गव्हाच्या पिठाच्या किंमती (Wheat Flour-aata) प्रति किलो 17 ते 18 रुपये होत्या. या एप्रिल महिन्यात किंमती प्रति किलो तब्बल 32.38 रुपयांवर पोहचल्या आहेत. पिठाच्या किंमतीत झालेली ही प्रचंड वाढ सामान्य ग्राहकांच्या (Consumer) मुळावर आली आहे. गव्हाचे उत्पादन आणि साठा घसरल्याने (Production and Stocks fallen) ही परिस्थिती ओढावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्रिय ग्राहक कल्याण, अन्नधान्य आणि पुरवठा विभागानेच (Union Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution) या दर वाढीवर प्रकाश टाकला आहे. शनिवारी गव्हाच्या पिठाचे भाव 32.78 रुपये प्रति किलो झाले. जे गेल्या वर्षीच्या 30.03 रुपये प्रति किलो या भावापेक्षा 9.15 टक्क्यांनी जास्त असल्याचे खात्याने स्पष्ट केले. विभागाच्या मते, 156 केंद्रांचा आढावा घेतला असता, पोर्ट ब्लेअर येथे सर्वाधिक जास्त 59 रुपये प्रति किलो तर पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे सर्वात निच्चांकी 22 रुपये प्रति किलो भावाने गव्हाचे पीठ मिळाले.

मुंबईत सर्वाधिक भाव

देशातील चार प्रमुख शहरात गव्हाच्या पिठाचे दर कमी जास्त आहेत. त्यात सर्वाधिक किंमत आहे ती मुंबई शहरात. मुंबईत गव्हाच्या पिठाचे भाव प्रति किलो 49 रुपये इतके आहे. तर त्याखालोखाल चेन्नईत 34 रुपये प्रति किलो भाव तर कोलकत्तामध्ये गव्हाच्या पिठासाठी प्रति किलो 29 रुपये आणि दिल्लीत सर्वात कमी 27 रुपये प्रति किलो दर आहेत.

रशिया-युक्रेन युद्धावर दरवाढीचे खापर

या वर्षाच्या सुरुवातीपासून पिठाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारीपासून आतापर्यंत 5.81 टक्के दरवृद्धी झाली आहे. यामध्ये उच्चांकी पातळी एप्रिल महिन्यात गाठण्यात आली. एप्रिल महिन्यात गव्हाच्या पिठाचे दर सर्वात उच्चांकी पातळीवर गेल्याचे दोन वर्षात समोर येत आहे. सर्वच क्षेत्रातील महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरविण्यात येत आहे. गव्हाच्या पिठाचे दर वाढीचे खापर ही या दोन देशाच्या संघर्षावर फोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे या युद्धामुळे डिझेलचे दर वाढले असून वाहतूक खर्चात झालेली वाढ गव्हाच्या किंमतीवर आणि पिठाच्या किंमतीवर झाला आहे.

2017 नंतर पहिल्यांदा दरात तेजी

घाऊक महागाई वाढल्याने सर्वसामान्य जगण्यासाठी धडपड करत आहे. सरकार महागाई रोखण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. 2014 पासून केंद्रात सत्तेवर आलेल्या सत्ताधारी पक्षाला महागाई रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही. 2017 साली पहिल्यांदा गव्हाच्या पिठाच्या किंमतीत 7.62 टक्क्यांची वाढ झाली होती. तर एप्रिल 2022 मध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा हा रेकॉर्ड ही मागे पडला आहे. यंदा गव्हाच्या पिठाच्या किंमतीत 7.62 टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली.

जीभेचे चोचले महागले

गव्हाच्या पिठाचे दर वृद्धीचा परिणाम बेकरी पदार्थांवरही दिसून आला आहे. बिस्किटांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर बेकरी पदार्थांच्या किंमतीत ही वाढ दिसून आली. महागाईची झळ सकाळच्या नाष्ट्यावर दिसून आली. बेकरी ब्रेडच्या किंमतीत 8.39 टक्क्यांची वृद्धी या मार्च महिन्यात दिसून आली. 2015 नंतर ही उच्चांकी वाढ असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.