AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉ आणि RSS वर बंदी घाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी, काय आहे प्रकरण?

USCIRF : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांच्यावर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केली आहे.

रॉ आणि RSS वर बंदी घाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी, काय आहे प्रकरण?
apply ban on rssImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 16, 2026 | 4:43 PM
Share

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) ट्रम्प सरकारला भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांच्यावर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस केली आहे. या संस्थांमुळे भारतातील धार्मिक स्वातंत्र्य कमी झाले आहे असा आरोप करण्यात आला आहे. भारताला धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत विशेष चिंतेचा देश असे संबोधत USCIRF ने ट्रम्प सरकारला भारताशी असलेल्या शस्त्रविक्री आणि व्यापार धोरणांवर पुनर्विचार करण्याचेही आवाहन केले आहे. भारताने अद्याप यावर भाष्य केलेले नाही. आता ट्रम्प याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर आरोप

USCIRF ने अलिकडेच एक वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. आयोगाने या अहवालात म्हटले आहे की भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती सतत खालावत चालली आहे. तसेच या अहवालात धार्मिक अल्पसंख्याक आणि त्यांच्या पूजा स्थळांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच या कायद्यांमध्ये आरोपींना कडक शिक्षेची तरतूद आहे. धार्मिक अल्पसंख्याकांवर जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेवरही प्रश्न

महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिका भारतावर हे आरोप करत आहे. मात्र अमेरिकेतच मागील वर्षभरात हिंसा आणि वांशिक भेदभावाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यानंतर अमेरिकेत भारतीय, आफ्रिकी आणि आशियाई लोकांविरोधात भेदभावाच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप आहे. तसेच ट्रम्प यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांची इस्लामविरोधी भूमिका असल्याचेही म्हटले जाते. अमेरिकेत भेदभाव वाढत असताना आता अमेरिकेकडून भारतावर आरोप होत आहेत.

वक्फ सुधारणा कायद्यावर टीका

USCIRF ने आपल्या अहवालात भारत सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्यावरही ही टीका केली आहे. हा कायदा इस्लामी धर्मार्थ मालमत्तांच्या नियमन आणि व्यवस्थापनात मोठे बदल करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर चौकट देण्यासाठी आणण्यात आला होता. या अहवालात याशिवाय उत्तराखंड सरकारच्या अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण कायद्यावर ही टीका करण्यात आली आहे.

ट्रम्प प्रशासनाला सल्ला

USCIRF ने ट्रम्प प्रशासनाला भारतावर धार्मिक मुद्द्यांबाबत दबाव आणण्याची शिफारस केली आहे. तसेच अमेरिकन सरकारने भारताला शस्त्र विक्री टाळावी, कारण भारत सरकारकडून अमेरिकन नागरिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरोधात धमकावणे आणि छळाच्या घटना सुरू आहेत असा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. आता ट्रम्प प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...