सोन्याची खरेदी करताच अवघ्या काही मिनिटांत प्युअर गोल्ड तुमच्या हाती, तुम्ही ऑर्डर केली का?

Dhanteras Gold Silver Coin Shopping : धनत्रयोदिशी (Dhanteras 2024) काही कामानिमित्त घरीच अडकून पडला असाल आणि सोन्याची खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या सोने आणि चांदीच्या शिक्क्यांची खरेदी करू शकता. ऑनलाईन सोन्याची खरेदी करताच अवघ्या काही मिनिटांत प्युअर गोल्ड तुमच्या हाती असेल.

सोन्याची खरेदी करताच अवघ्या काही मिनिटांत प्युअर गोल्ड तुमच्या हाती, तुम्ही ऑर्डर केली का?
घर बसल्या मिळवा सोने आणि चांदीची नाणी
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 4:08 PM

धनत्रयोदिशीला (Dhanteras 2024) खरेदी महत्त्वाची मानण्यात येते. दिवाळीला धनत्रोयदशीची खरेदी शुभ मानण्यात येते. पण काही कामानिमित्त तुम्हाला घरा बाहेर पडता येत नसेल तर हरकत नाही. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, उपकरणं, घरातील आवश्यक वस्तूंप्रमाणेच तुम्ही सोने आणि चांदी सुद्धा आता घरपोच मिळवू शकता. त्यासाठी भर गर्दीत वेळ वाया घालवण्याची जराही आवश्यकता नाही. तुम्हाला घरपोच सोने आणि चांदीची शिक्के मिळतील. सोने खरेदी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात तुम्हाला घरपोच ऑर्डर मिळेल.

स्विगी, ब्लिंकिट, बिग बिस्केट 10 मिनिटात देणार सोने

धनत्रयोदिशी स्विगी, ब्लिंकिट आणि बिग बास्केट सारखी ऑनलाईन व्यापारी प्लॅटफॉर्म (Quick Commerce Platform) तुम्हाला शिक्क्यांपासून ते बिस्किट आणि 0.50 ग्रॅमची सोन्याची शिक्के घरपोच देतील. सोने खरेदी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात तुम्हाला घरपोच ऑर्डर मिळेल. मेट्रो आणि इतर काही शहरात ही कॉमर्स प्लॅटफॉर्म अवघ्या 10 मिनिटांत होम डिलिव्हरीचा दावा करतात. ऑर्डर करताना याविषयीची संपूर्ण माहिती अगोदरच घ्या. मग ऑर्डर करा.

हे सुद्धा वाचा

बिग बास्केट पण उतरले मैदानात

बिग बास्केटने या क्षेत्रातील दिग्गज ब्रँड तनिष्कसोबत करार केला आहे. ग्राहकांना दिवाळीच्या काळात, धनत्रयोदशीला सोने आणि चांदीचे शिक्के घरबसल्या मागवता येतील. ग्राहकांना तनिष्क ब्रँडची लक्ष्मी आणि गणेशाची ((999.9 शुद्ध) चांदीची शिक्के, तनिष्कचे 22 कॅरेट सोन्याची 1 ग्रॅमची नाणी मागवता येईल. सोबत 22 कॅरेट गोल्ड कॉईनची देवी लक्ष्मीची मोटिफ डिझाईनचे 1 ग्रॅमचे नाणे मागवता येईल. ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला अवघ्या 10 मिनिटात तुम्हाला घरपोच नाण्याची डिलिव्हरी करण्यात येईल.

स्विगी इन्स्टामार्ग, ब्लिकिंटवर करा खरेदी

स्विगी इन्स्टामार्टवर गोल्ड क्वॉईन खरेदी करता येतील. ग्राहकांना ही कॉमर्स प्लॅटफॉर्म अवघ्या 10 मिनिटांत घरपोच डिलिव्हरीचा दावा करतात. ब्लिंकिटच्या ॲपवर तुम्हाला सोने आणि चांदीची खरेदी करता येईल. Amazon च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सोने आणि चांदीचे शिक्के खरेदी करू शकता. याठिकाणी तुम्हाला विविध ब्रँड्सची शिक्के, बिस्किट खरेदी करण्याची संधी मिळेल. यामध्ये कल्याण ज्वेलर्स, पीसी ज्वेलर्स, बंगळुरू रिफायनरी, MMTC-PAMP, मुथूट, पीसी चंद्रा ज्वेलर्सची सोने आणि चांदीची नाणी खरेदी करता येईल.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.