फ्लॅट नव्हे अख्खा टॉवरच केला खरेदी… मुंबईतील सर्वात मोठी डील; तब्बल 711 कोटी…

अँजल वनचे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू येथे ₹711 कोटींना संपूर्ण निवासी टॉवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही देशातील सर्वात मोठी रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी डील मानली जाते. एम्बेसी टेराझा प्रकल्पातील 63,000 वर्ग फूट कारपेट एरियाचा हा टॉवर लक्झरी सुविधांनी युक्त आहे.

फ्लॅट नव्हे अख्खा टॉवरच केला खरेदी... मुंबईतील सर्वात मोठी डील; तब्बल 711 कोटी...
Dinesh Thakkar property deal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 12:49 PM

अँजल वनचे संस्थापक, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश ठक्कर यांनी मुंबईत एक मोठी डील केली आहे. मुंबईतील ही सर्वात मोठी डील असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील जुहू येथे त्यांनी 711 कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी करार केला आहे. विशेष म्हणजे ठक्कर यांनी केवळ एखादा फ्लॅट खरेदी केलेला नाहीये, तर संपूर्ण निवासी टॉवरच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही देशातील रेसिडेन्शिएल यूनिटची ही सर्वात मोठी डील असल्याचं मानलं जात आहे.

एम्बेसी डेव्हल्पमेंट लिमिटेडने याबाबतची माहिती दिली आहे. दिनेश ठक्कर यांनी एक एमओयू सही केला आहे. त्यानुसार जुहू येथील Embassy Terazza प्रकल्पातील एक संपूर्ण टॉवर ठक्कर यांना विकण्यात येणार आहे. ग्राऊंड प्लस सात मजल्याचं हे टॉवर आहे. यात एकूण 63,000 वर्ग फूट कारपेट एरिया आहे. या हिशोबाने प्रॉपर्टीची किंमत सुमारे 1.13 लाख प्रति वर्ग फूट होते. Embassy Terazza मुंबईतील जुहू तारा रोडवरील अल्ट्रा लग्जरी रेजिडेन्शियल प्रकल्प आहे. हा परिसर मुंबईतील सर्वात महागडा आणि प्रीमियर विभाग मानला जातो.

50 हून अधिक लग्जरी घरे

दोन एकरावरील या प्रकल्पात 50 रेजिडेन्स बनवण्याची योजना आहे. कंपनीच्या मते, प्रकल्पाची अंदाजित ग्रॉस डेव्हल्पमेंट व्हॅल्यू 3,000 कोटीहून अधिक आहे. हा प्रकल्प कमी घनत्वाच्या डिझाइनमध्ये तयार केला जात आहे. कंपनीच्या मते, या पाच टॉवरमध्ये प्रत्येक मजल्यावर केवळ एकच फ्लॅट असणार आहे. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना समुद्र आणि मुंबईतील शानदार व्ह्यू पाहता येणार आहे. या टॉवरमध्ये मोठ्या आकाराचे हे घरे असणार आहेत. इनडोअर गार्डन, वेलनेस आणि लाइफस्टाईलच्या सुविधाही यात असणार आहेत. एकांतता, ऐसपैस जागा आणि समोरून दिसणारा अथांग समुद्र या गोष्टी लक्षात ठेवून दिनेश ठक्कर यांनी ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या या नव्या घराचं नाव ‘Angelus’ ठेवलं आहे.

एम्बेसी डेव्हल्पमेंट्स मुंबई आणि आसपासच्या परिसरात लग्जरी निवासी परिसराचा विस्तार करण्यात येत आहे. कंपनीच्या मुंबई विभागात अनेक लग्जरी रहिवाशी योजना आहेत. यात वरळीत एम्बेसी सिटाडेल, अलिबागमध्ये एम्बेसी सेरेनिटी, पनवेलमध्ये एम्बेसी पार्क आणि ठाण्यात एम्बेसी वनचा समावेश आहे.

टॉवरच खरेदी केला

या डीलची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिनेश ठक्कर यांनी केवळ एक अपार्टमेंट खरेदी केलं नाही. तर त्यांनी आठ स्तरवाला हा पूर्ण टॉवरच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 63,000 वर्ग फूट RERA कारपेट एरिया खरेदी करण्याचा करार केला आहे. सामान्यपणे लग्जरी घरांची किंमत एकाएका अपार्टमेंट किंवा प्रति वर्ग फूटाच्या हिशोबाने पाहिली जाते. पण या केसमध्ये संपूर्ण टॉवरच खरेदी करण्यात आला असून ही सामान्य लग्जरी होम डीलपेक्षा ही वेगळी डील आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us