Dmart Secret Shopping Tips : एक हजार रुपयात महिन्याभराचे रेशन कसे भराल ? ही सोपी युक्ती येईल कामी…

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे घराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे कुटुंबाने योग्य नियोजन केले तर अवघ्या १००० रुपयांत महिन्याचे रेशन भरता येईल.

Dmart Secret Shopping Tips : एक हजार रुपयात महिन्याभराचे रेशन कसे भराल ? ही सोपी युक्ती येईल कामी...
Dmart Secret Shopping Tips
| Updated on: Jul 15, 2026 | 12:05 AM

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईमुळे प्रत्येक कुटुंब आपला मासिक खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. अशा स्थितीत,कमी बजेटमध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी डीमार्टसारखी रिटेल स्टोअर्स अनेकांची पहिली पसंती बनत आहेत. आता आपण एक हजार रुपयांच्या बजेटमध्ये एका छोट्या कुटुंबासाठी अनेक जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य दिले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात एक हजार रुपयात महिन्याचे रेशन कसे भरायचे याच्या टिप्स पाहूयात..

सुमारे १००० रुपयांच्या बजेटमध्ये एका लहान कुटुंबासाठी अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे शक्य आहे. सर्वप्रथम, तांदूळ, डाळी, खाद्यतेल, मीठ, साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंना खरेदीत प्राधान्य दिले पाहिजे. त्यानंतर, चहा पावडर, मसाल्याची पावडर, साबण, डिटर्जंट यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या यादीत भर घालता येईल. स्नॅक्स, शीतपेये किंवा आकर्षक ऑफर्सकडे लक्ष देण्याच्या ऐवजी घरासाठी खरोखर आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करणे चांगले.

यादी तयार ठेवा..

खरेदीला जाण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची एक अचूक यादी तयार करून आणि आगाऊ बजेट ठरवून डीमार्टमध्ये जावे. केवळ ऑफर्सच्या नावाखाली अनावश्यक वस्तू न खरेदी करून तुम्ही अधिक बचत करू शकता. तसेच, जर तुम्ही डीमार्टमध्ये उपलब्ध असलेल्या स्टोअर ब्रँडच्या उत्पादनांकडे पाहिले, तर कधीकधी तुम्हाला कमी किंमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळू शकतात.

लहान मुलांसोबत न गेलेलेच बरे…

अनेक जण डीमार्टसारख्या शॉपिंग सेंटरला आपल्या मुलांना घेऊन जातात. लहान मुले नजरेला आकर्षक वस्तू पडणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरतात. मुलांचा हट्ट पाहून आपल्याला गरज नसतानाही आपण अनेक वस्तू खरेदी करतो. जेव्हा आपण जेव्हा बिलिंगला काऊंटरवर जातो, तेव्हा बिल आपल्या बजेटच्या बाहेर जाते. मुलांसाठी ते आवश्यक आहे असे वाटून आपण त्या वस्तू खरेदी करतो. यामुळेच अनेक लोकांचे डीमार्टचे बिल जास्त होते. याशिवाय, जर आपण योग्य योजनेनुसार खरेदी केली, तर आपण १००० रुपयांच्या बजेटमध्ये दोन व्यक्तींच्या लहान कुटुंबासाठी अनेक आवश्यक वस्तू खरेदी करू शकतो. मात्र, एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे ते म्हणजे यादी केवळ आवश्यक वस्तूंची दिलेली आहे.

Follow Us