बँकेतील कामं घ्या उरकून पटापट, सुट्यांमुळे जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद

| Updated on: Jun 27, 2022 | 2:33 PM

बँकेतील महत्वाची कामं लवकर उरकून घ्या. जुलै महिन्यात तब्बल 14 दिवस सुट्या असणार आहेत. ओडिशातील रथ यात्रा, गुरु हरगोबिंदजी यांच्या जन्मदिनी, ईद अल अजहा, शहीद उधमसिंह यांच्या शहीद दिनासह इतर दिवशी सुट्टी आहे.

बँकेतील कामं घ्या उरकून पटापट, सुट्यांमुळे जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद
बँकांचे शटर डाऊन
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

जुलै महिन्यात बँकेची महत्वाची कामे लवकरात लवकर उरकून घ्या. कारण या महिन्यात बँकांना तब्बल 14 दिवसांच्या सुट्या (Bank Holiday) आहेत. देशभरातील बँकात एकदाच सर्व सुट्या नसतील. पण वेगवेगळ्या सणाला मात्र सर्व राज्यातील बँकांना सुट्या राहतील. या दिवशी बँकांचे कामकाज ठप्प राहिल. स्थानिक सणावारांना संबंधित राज्यात सुट्टी असल्याने बँकांचे कामकाज होणार नाही(No Bank work). एकाच दिवशी सर्वच राज्यातील बँका बंद राहतील,असे नाही. परंतू, राष्ट्रीय सण, उत्सवादरम्यान (National Festivals, Utsav) देशातील सर्व राज्यामधील बँकांना एकाच दिवशी सुट्टी मिळते. यामध्ये होळी, दसरा, दिवाली, स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन यादिवशी सर्वांना सुट्टी मिळते. रविवारीही सर्व बँका बंद असतात. तर दुस-या आणि चौथ्या शनिवारी ही बँकांना सुट्टी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) सुट्यांची एक यादी जाहीर करते.त्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी आहे आणि राष्ट्रीय सुटी कोणती याची माहिती मिळते.

बँकेच्या सुट्ट्या म्हणजे शटर डाऊन, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंक शाखेत त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाइन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. तसेच हे लक्षात ठेवा की काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. बँकांना सुट्टी असली तरी नागरिकांसाठी अनेक बँकांनी मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन बँकिंगची सोय केलेली आहे. त्यामुळे या काळात सुट्टी असली तरी ग्राहकांना रक्कम हस्तांतरण करणे, मालाचे पेमेंट करणे यासारखे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करता येतील. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग कामाव्यतिरिक्त इतर व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता पडत नाही.

हे सुद्धा वाचा

सुट्या ही तीन श्रेणीत

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

अशी आहे सुटयांची यादी

1 जुलै : कांग (रथयात्रा), भुवनेश्वर, ओडिशा रथयात्रा

3 जुलै : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

7 जुलै : खर पुजा, आगरतळ्यात बँकांना सुट्टी

9 जुलै : दुसरा शनिवार

10 जुलै : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

11 जुलै : ईद-उल-आझा (जम्मु, श्रीनगर)

13 जुलै : भानू जयंती (गंगटोक,सिमला)

14 जुलै : शिलॉगमधील बँका बंद

16 जुलै : हरेला (डेहराडून)

17 जुलै : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

23 जुलै : चौथा शनिवार

24 जुलै : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

26 जुलै : केरला पुजा

31 जुलै : रविवार (सार्वजनिक सुट्टी)