ITR : एक चूक पडेल महागात! करदात्यांना 5 हजारांचा फटका

| Updated on: Apr 02, 2023 | 7:51 PM

ITR : आयटीआर भरताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. करदात्यांनी काळजी न घेतल्यास त्यांना 5 हजारांचा फटका बसू शकतो. काय काळजी घेणे अर्ज भरताना आवश्यक आहे, ते पाहुयात

ITR : एक चूक पडेल महागात! करदात्यांना 5 हजारांचा फटका
Follow us on

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2023 रोजीपासून नवीन आर्थिक वर्षाची (Financial Years) सुरुवात होत आहे. यासह आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे. सध्या वैयक्तिक इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल करण्यासाठी दोन प्रकारच्या कर व्यवस्था आहे. एक जुनी कर व्यवस्था आणि आता या आर्थिक वर्षापासून लागू झालेली नवीन कर प्रणाली (New Tax Regime). या दोन्ही योजनांमध्ये टॅक्स स्लॅब वेगवेगळे आहेत. मोदी सरकारने कर प्रणाली अधिक सूटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

आईटीआर फॉर्म
करदात्यांना आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत त्यांचे आयकर रिटर्न दाखल करावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्षासाठी ITR फॉर्म जारी केले आहेत. हे आर्थिक वर्ष समाप्त झाल्यानंतर करदाते आयटीआर फाईल करु शकतात. अनेक व्यक्ती, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे ITR फॉर्म आहेत. यामध्ये ITR 1, ITR 2, ITR 3, ITR 4, ITR 5, ITR 6 आणि ITR 7 यांचा समावेश आहे.

नाहीतर भरावा लागेल दंड
वेगवेगळ्या गरजेनुसार, वेगवेगळे आईटीआर फॉर्म दाखल करता येईल. तर ITR-1 आणि ITR-4 हा अर्ज मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम करदात्यांसाठी फायदेशीर ठरेल. पण हा अर्ज भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना 5 हजार रुपयांचा भूर्दंड सोसावा लागेल.

हे सुद्धा वाचा

इनकम टॅक्स रिटर्न
आर्थिक वर्ष 2022-23 साठी आईटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. जर करदात्याला 31 जुलै पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता आले नाही तर त्याला 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरावा लागेल. या विलंबापोटी त्याला दंड सोसावा लागेल. भूर्दंड म्हणून 5 हजार रुपये द्यावे लागतील.

जास्त फटका
आयकर विभागानुसार, उशीरा आयटीआर दाखल करत असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्यानंतर पण तुम्ही आयटीआर निश्चित तारखेपर्यंत जमा केला नाही तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल. तसेच आयकर कायद्यानुसार, शिक्षेची तरतूद आहे.

हे ठेवा लक्षात
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.