Foreign Stock Market : घर बसल्या विदेशी बाजारातून कमाई, गुंतवणुकीचा असा आहे फंडा

| Updated on: Jan 12, 2023 | 11:49 PM

Foreign Stock Market : भारतीय गुंतवणूकदारांना विदेशी बाजारातून कमाई करता येईल.

Foreign Stock Market : घर बसल्या विदेशी बाजारातून कमाई, गुंतवणुकीचा असा आहे फंडा
Follow us on

नवी दिल्ली : जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी (Investors) जगात अनेक संधी आहेत. भारतीय शेअर बाजाराने (Share Market) गेल्या वर्षी चढउतार असतानाही गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. भारत,झपाट्याने आर्थिक विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.  जगातील इतर शेअर बाजारही गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. तर अशा बाजारात भारतीय गुंतवणूकदारही नशीब आजमावू शकतो का, असा सवाल आहे. तर गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येऊ शकते. अनेक म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्या गुंतवणूकदारांना थेट परदेशी बाजारात गुंतवणुकीची संधी देत आहे.

भारतीय म्युच्युअल फंड कंपन्या तीन वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय फंड्स देतात. पहिल्या प्रकारात या कंपन्या अशा फंडमध्ये थेट गुंतवणूक करतात. दुसरा पर्याय हा फीडर फंड्सचा आहे. यामध्ये जागतिक बाजारात गुंतवणूक करण्यात येते. तर तिसरा पर्याय विविध आंतरराष्ट्रीय फंड्समध्ये गुंतवणुकीचा आहे.

काही म्युच्युअल फंड एका विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करतात. काही फंड्स, एखाद्या वस्तू, कमोडिटी लिंक्ड फंड्समध्ये गुंतवणूक करतात. सोन्यावर आधारीत फंड्समध्ये गुंतवणूक करतात. तर काही फंड वेगवेगळ्या बाजारात गुंतवणूक करतात.

हे सुद्धा वाचा

परदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचा कारभार चांगला सुरु आहे. तर काही फंड्सने कमाल केली आहे. सोने आणि वायदे बाजारातील फंडातून 50 ते 70 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. त्यामुळे विदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या फंडची घोडदौड जरुर तपासा.

बाजारात हे फंड कुठे गुंतवणूक करतात. त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धतही समजून घ्या. हे फंड किती वर्षांपासून परदेशी बाजारात गुंतवणूक करत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना किती कमाई करुन दिली. त्यांनी वार्षिक 3 ते 5 टक्के रिटर्न दिला का याची माहिती घ्या.

आंतरराष्ट्रीय फंड्सचे कर पद्धत वेगळी असते. हायब्रिड जागतिक फंडात भारतीय कंपन्या जास्तीत जास्त 65 टक्के गुंतवणूक करतात. इतर परदेशी फंडावर एक नियमीत इक्विटी फंड कर द्यावा लागतो.