EPFO Alert: …तर पीएफमध्ये आलेले व्याजाचे पैसे गायब होणार, चुकूनही हा नंबर शेअर करू नका

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी त्याचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा महत्त्वाचा असतो, जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुम्ही ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपल्या सर्व ग्राहकांना एक अलर्ट (EPFO Alert) जारी केलाय. ही रक्कम भविष्याचे रक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निधी आहे.

EPFO Alert: ...तर पीएफमध्ये आलेले व्याजाचे पैसे गायब होणार, चुकूनही हा नंबर शेअर करू नका
पीएफ अकाऊंट
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 9:27 AM

नवी दिल्ली : तुम्हीही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपल्या सर्व ग्राहकांना एक अलर्ट (EPFO Alert) जारी केलाय. EPFO ने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केलेय. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिलीय.

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा महत्त्वाचा

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी त्याचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा महत्त्वाचा असतो, जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुम्ही ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने आपल्या सर्व ग्राहकांना एक अलर्ट (EPFO Alert) जारी केलाय. ही रक्कम भविष्याचे रक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याजही मिळते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पीएफच्या पैशांबाबत खूप सतर्क राहण्याची गरज आहे.

जाणून घ्या काय म्हणाले EPFO?

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे की, “ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेदारांकडून UAN नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा EPFO ​​आपल्या खातेदारांना कोणताही फोन कॉल करत नाही.”

पीएफ खात्यात पैसे येऊ लागले

भविष्य निर्वाह निधी (PF) ग्राहकांना दिवाळीपूर्वी EPFO ​​कडून चांगली बातमी मिळू शकते. EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 चे व्याज पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलीय. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागलेत. अशा परिस्थितीत सर्व खातेदार त्यांच्या खात्यात किती पीएफ पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत. तुम्ही तुमचे पीएफ स्टेटमेंट कसे काढू शकता ते जाणून घ्या.

पैसे आले नाही तर काळजी करू नका

आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळालेले नसून लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील, अशी अपेक्षा आहे. व्याजाची रक्कम झोननिहाय जमा होत असल्याने अनेक वेळा वेगवेगळ्या झोनमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागतो.

इतके व्याजाचे पैसे आलेत

2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवी झेंडी दिली होती. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. आता EPFO ​​ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे.

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! धुक्यामुळे 18 गाड्या रद्द, 2 गाड्या अंशतः रद्द, संपूर्ण यादी तपासा

NHPC सह देशातील बड्या सरकारी कंपन्यांनी यंदा सरकारला 8572 कोटी दिले, कंपन्या असे का करतात?

EPFO Alert then the interest money in PF will disappear don’t share this number by mistake