EPFO ची मोठी घोषणा, क्लेम सेटलमेंट मर्यादा वाढवली, आता ‘इतके’ पैसे काढता येणार

EPFO ने देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता क्लेम सेटलमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

EPFO ची मोठी घोषणा, क्लेम सेटलमेंट मर्यादा वाढवली, आता इतके पैसे काढता येणार
epfo
| Updated on: Jun 24, 2025 | 8:11 PM

EPFO ने देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता क्लेम सेटलमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. कर्मचारी गरज पडल्यास PF मधून 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम तात्काळ काढू शकतात. ऑटो सेटलमेंटची मर्यादा आधी एक लाख रुपये होती ती आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना त्वरित पैसे मिळणार आहेत.

ऑटो-सेटलमेंट म्हणजे काय?

कोरोना काळात EPFO ​​ने ऑटो-सेटलमेंट सुविधा सुरू केली होती. कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. याद्वारे तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित झाली आहे. याचा अर्थ पैसे काढण्यासाठी तुम्हाला EPFO ​​कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच जास्त कागदपत्रांचीही गरज भासणार नाही. सिस्टम स्वतः तुमच्या अर्जाची पडताळणी करते आणि पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर करते.

याआधी ही सुविधा 50,000 रुपयांपर्यंतच्या अर्जांसाठी होती मात्र ती मे 2024 मध्ये 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती, मात्र आता ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही मॅन्युअल पडताळणीशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम तात्काळ काढू शकता.

अनेकांना फायदा होणार

यापूर्वी तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास असेल तर तुम्हाला मॅन्युअल व्हेरिफिकेशन करावे लागत होते. यासाठी ईपीएफओ कार्यालयात जावे लागत असायचे, यासाठी बरीच कागदपत्रे आणि वेळ लागत असे. त्यामुळे ज्या लोकांना पैशांची गरज आहे असा लोकांना त्रासाचा सामना करावा लागत होता, मात्र आता मर्यादा वाढल्याने अनेकांना फायदा होणार आहे.

पीएफचे पैसे कोणत्या कारणांसाठी काढता येतात?

पीएफचे पैसे वैद्यकीय आणीबाणी, लग्न, घर खरेदी करणे, बांधणे किंवा दुरुस्ती करणे, गृहकर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण बेरोजगारी अशा कामांसाठी पैसे काढू शकता.