EPFO On WhatsApp: एक क्लिक… व्हॉट्सॲपवर मिळवा PF ची ए टू झेड माहिती… असे व्हा कनेक्ट
EPFO On WhatsApp Channel: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. त्यांना आता व्हॉट्सॲपवर पीएफची ए टू झेड माहिती मिळणार आहे. त्यासाठी नोकरदारांना असे कनेक्ट होता येईल.

EPFO Update about WhatsApp: देशातील कोट्यवधी सदस्यांसाठी आणि नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएफ खात्यासंदर्भातील अपडेट्स, नियम आणि विविध योजनांची माहिती त्यांना आता घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी ईपीएफओ कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. EPFO च्या व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सर्व माहिती सहज उपलब्ध होईल. ही सेवा कर्मचार्यांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध आहे.
2 लाखांहून अधिक सदस्य प्लॅटफॉर्मवर
ईपीएफओने सोशल मीडियावर सक्रियता वाढवली आहे. देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 2 लाख सदस्यांनी व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून पीएफ, ईपीएफ, पेन्शन आणि विमा योजनेची माहिती मिळवली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना याविषयीची माहिती नाही. ईपीएफओने अधिकाधिक सदस्यांनी या चॅनलशी कनेक्ट होण्याचे आवाहन केले आहे.
सदस्यांना कोणकोणती माहिती मिळणार?
व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सर्व विषयांवरील नियमित अपडेट्स आणि अधिकृत माहिती मिळत राहील. EPF, EPS, PF, EDLI, Pension यासोबतच पीएफ खात्याशी संबंधित नियम, निवृत्ती वेतन, कर्मचारी जमा संलग्न विम्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आणि निर्णयाची माहिती मिळेल.
या सोबतच कर्मचाऱ्यांना पीएफ सदस्यांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय, विभागीय आणि प्रादेशिक स्तरावरील शिबिरांची माहिती मिळेल. त्यांना ॲडव्हान्स पीएफ दावा आणि मार्गदर्शक ट्युटोरियल्स दिसतील. त्यात पीएफ खात्यातून अग्रीम रक्कम कशी काढायची. क्लेम स्टेट्स कसं पाहायचं, याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. अर्थात हे व्हॉट्सॲप चॅनल केवळ माहिती देण्यासाठी आहे. या चॅनलवरून थेट पीएफ क्लेम दाखल करणे, पैसे काढणे आणि वैयक्तिक पीएफ खात्यातील शिल्लक तपासणे शक्य नसेल. त्यासाठी सदस्य ईपीएफओच्या अधिकृत पोर्टल, उमंग ॲपचा वापर करू शकतील. ईपीएफओच्या व्हॉट्सॲप चॅनलशी जोडण्यासाठी सर्चमध्ये जाऊन ईपीएफओ टाईप करून अधिकृत चॅनलला फॉलो करा. त्यामुळे ईपीएफओ संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. पण इथं केवळ माहिती मिळेल. पीएफ काढण्यासाठी अधिकृत पोर्टल, उमंग प्लॅटफॉर्मवर जावे लागेल.