आता एका क्लिकवर मिळेल EPFO ची माहिती; सुरू झाली Passbook Lite सेवा, काय काय होईल फायदा

EPFO ने सदस्यांसाठी पोर्टलवर नवीन 'Passbook Lite' ही सुविधा सुरू केली आहे. त्या आधारे कर्मचाऱ्यांना खाते, योगदान, किती रक्कम काढली आणि किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती एका लॉगिनवरच समोर येईल. डिजिटल सुविधा अधिक सोयीस्कर करण्याचा हा प्रयत्न आहे.

आता एका क्लिकवर मिळेल EPFO ची माहिती; सुरू झाली Passbook Lite सेवा, काय काय होईल फायदा
ईपीएफओ पासबुक लाईट
| Updated on: Sep 19, 2025 | 1:55 PM

EPFO Passbook Lite : ईपीएफओने सदस्यांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण EPF सेवा आणि खात्याची माहिती एका लॉगिन आधारे पाहता येईल. सदस्यांना सर्वच प्रक्रिया आणि सुविधा एका छताखाली मिळावी यासाठी हे पाऊल टाकण्यात आलं आहे. केंद्रीय मत्री मनसुख मांडविया यांनी याविषयीची माहिती दिली. सदस्यांसाठी हा एक चांगला अनुभव असेल. त्यांना सर्व मुख्य सेवांचा ॲक्सेस एका लॉगिनमधून मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.

Passbook Lite सुविधा

EPFO ने आपल्या सदस्य पोर्टलमध्ये नवीन सुविधा ‘Passbook Lite’ सुरू केली आहे. या माध्यमातून सदस्य त्यांच्या EPF खात्याची थोडक्यात माहिती मिळवू शकतील. यामध्ये त्यांच्या खात्यात किती योगदान जमा झाले. त्यांनी किती वेळा आणि किती रक्कम काढली आणि आता त्यांच्या खात्यात किती रक्कम शिल्लक उरली आहे ही माहिती एकाच क्लिकवर, एकाच लॉगिन आधारे मिळेल. एकाच फॉर्म्याटमध्ये त्यांना ही माहिती सहज उपलब्ध होईल.

आता स्वतंत्र पोर्टलवर जाण्याची गरज नाही

या सुविधेमुळे सदस्यांना त्यांच्या EPF खात्याविषयीची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही. आता सर्व महत्त्वपूर्ण सेवा एकाच लॉगिनच्या आधारे त्यांना ॲक्सेस करता येतील. डिजिटल प्रक्रिया अधिक सोपी आणि सुकर करण्यासाठी हे पाऊल असल्याचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले आहे.

या लिंकवरून घेता येईल माहिती

सदस्य Passbook Lite सुविधेचा लाभ EPFO सदस्य पोर्टल unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यावरून घेऊ शकतील. ही लिंक थेट पोर्टलवर पोहचवते. याठिकाणी सदस्यांना त्यांच्या EPF ची माहिती सहज उपलब्ध होते.

ATM-UPI च्या मदतीने काढा पीएफ

EPFO सदस्य लवकरच एटीएम आणि युपीआय ॲपच्या मदतीने त्यांची पीएफ रक्कम काढू शकतील. या प्रक्रियेत एक विशेष ATM कार्ड देईल. हे एटीएम कार्ड PF खात्याशी लिंक असेल. या कार्डचा वापर करून थेट पीएफ रक्कम काढता येईल. ईपीएफओने मान्यता दिलेल्या एटीएममधूनच ही रक्कम निघेल. त्यासाठी EPFO ​​युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (UAN) जोडलेल्या कार्डचा वापर करावा लागेल.

UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल. EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून सदस्यांना त्यांची पीएफ रक्कम काढता येईल.