AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF claim: 20 दिवसांत पीएफ क्लेमचे पैस न मिळाल्यास अतिरिक्त व्याज? EPFO चा नवीन नियम काय

EPFO PF Claim update: पीएफचा पैसा मिळवण्यासाठी केलेला दावा मंजूर होऊन जर निश्चित कालावधीत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नाही तर तुम्हाला अतिरिक्त व्याज मिळेल का? काय आहे ईपीएफओचा नवीन नियम?

PF claim: 20 दिवसांत पीएफ क्लेमचे पैस न मिळाल्यास अतिरिक्त व्याज? EPFO चा नवीन नियम काय
पीएफ क्लेम
| Updated on: Sep 22, 2026 | 9:43 AM
Share

EPFO New Rules: केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनाही खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था आहे. कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेन्शनचा लाभ देण्याचे नियोजन, व्यवस्थापन ही केंद्रीय संस्था करते. निवृत्तीनंतर एक मोठी आर्थिक मदत मिळते. अनेकदा पीएफ क्लेम केल्यानंतरही निश्चित वेळेत कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. पीएफ क्लेम एका निश्चित कालावधीत जमा न झाल्यास काही प्रकरणात अतिरिक्त व्याजच नाही तर नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते. मुंबईतील ग्राहक आयोगाने एका प्रकरणात ईपीएफओला याविषयीचे निर्देश दिले आहेत. एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या पीएफ क्लेममध्ये उशीर झाल्याने आयोगाने 6 टक्के प्रतिवर्ष व्याज देण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्याचा क्लेम 14.06 लाखांचा होता आणि सेटलमेंटमध्ये 35 दिवसांचा विलंब झाला होता.

किती दिवसात दाव्याचा निपटारा?

जून 2026 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालायने (Ministry of Labour and Employment) कोड ऑन सोशल सिक्योरिटी, 2020 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 2026 (Employees’ Provident Funds Scheme, 2026), कर्मचारी पेन्शन योजना, 2026 आणि कर्मचारी ठेव-लिंक्ड विमा योजना, 2026 अधिसूचित केली. हा नियम 29 जून 2026 रोजीपासून लागू झाला. या नियमानुसार, पीएफ, पेन्शन आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेचा दावा 20 दिवसात निकाली काढणे आवश्यक आहे.

PF दाव्याला उशीर झाल्यास?

जर 20 दिवसांच्या कालावधीनंतरही पीएफ दाव्याचा निपटारा झाला नाही तर ईपीएफओकडे तक्रार करता येते. त्यासाठी प्रादेशिक संचालकाकडे संपर्क करता येतो. याशिवाय EPFIGMS याठिकाणी तक्रार दाखल करता येते. या पोर्टलवर कर्मचारी हा पर्याय निवडून तक्रार दाखल करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तक्रारदारांसाठी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. याठिकाणी पीएफ, पेन्शनविषयीच्या तक्रारी मांडता येतात. त्यावर निर्णय होतो.

किती रक्कम काढता येईले हे कळणार

नवीन बदलानुसार, पीएफमधून किमान रक्कम काढण्यासाठी कमीत कमी 12 महिने नोकरी करणे बंधनकारक आहे. यापूर्वी लग्नाकरीता रक्कम काढण्यासाठी 7 वर्षांची सेवा असणे आवश्यक होते. EPFO च्या बदलाचा फायदा कर्मचार्‍यांना होईल. निकडीच्या वेळी त्यांना पीएफ काढता येईल. ईपीएफओने CITES 2.01 हे सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. नवीन प्रणालीमुळे सदस्यांना उपचार, घर खरेदी, लग्न, शिक्षण आदी कारणांसाठी ईपीएफ नियमांनुसार, जास्तीत जास्त किती रक्कम काढता येईल हे आधीच पाहता येईल. यामुळे सदस्यांना किती रक्कमेचा दावा करायचा हे ठरवणे सोपे होणार आहे.

Follow Us
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह