Explainer: सहकारी बँकांच्या नवक्रांतीला डिजिटल बळ! मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह काय सुविधा मिळणार? असा कायापालट होणार

Amit Shah on Cooperative Bank: सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीतच नाही तर आता ग्राहकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधेतही मोठा कायापालट होणार आहे. ग्राहकांना मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह अनेक सोयी-सुविधा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मुंबईत याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत.

Explainer: सहकारी बँकांच्या नवक्रांतीला डिजिटल बळ! मोबाईल बँकिंग, एटीएम कार्डसह काय सुविधा मिळणार? असा कायापालट होणार
सहकारी बँक इकोसिस्टिम
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 12, 2026 | 3:51 PM

भारताच्या ग्रामीण, निम्न शहरी भागात सहकारी बँकांभोवती राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण फिरत होते. सहकारी बँकांनी अनेक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. भारतीय लोकशाहीला सहकार चळवळीने समृद्ध केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या बँकांनी हिरारीने मदत केली. पण मध्यंतरी सहकार चळवळीला भ्रष्टाचाराची वाळवी लागली. अनियमिततेची बाधा झाली. राजकीय हितसंबंधांनी तिजोरी पोखरली गेली. या चळवळीलाच सुरूंग लागला. सहकारी बँकांची स्थिती नाजूक झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो वा नागरी बँका अथवा पतसंस्था यांचे घोटाळे, गैरव्यवहारांनी सर्वच जण होरपळले. आता या बँकांचा कायपालट होत आहे. हरवलेला विश्वास संपादन करण्यासाठी सरकारचे पाठबळ या बँकांना मिळाले आहे. सहकार क्षेत्रातील या नवक्रांतीला डिजिटल बळ मिळाले आहे. अनेक सोयी-सुविधांसह ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी या बँकांनी कंबर कसली आहे. सहकारातून समृद्धीकडे ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us