
आपल्या हक्काच्या घरासाठी माणूस वर्षानुवर्षे मेहनत करतो. कमावलेल्या पैशातून बचत करून घराची स्वप्न रंगवतो. मुंबई किंवा शहरी भागात आपलं घरं असावं यासाठी आग्रही असतो. मात्र घरांच्या किंमती पाहून आणि बचत केलेले पैशांचं गणित जुळवणं कठीण होतं.बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी कधी शहरापासून लांब घर घेण्याचा निर्णय होते. पण आपल्या स्वप्नातलं घर घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर आयुष्यभराची कमाईवाया जाण्याची शक्यता आहे. रियल इस्टेट मार्केटमध्ये तुम्हाला पैसे गुंतवून घराची प्रतीक्षा करणारे लाखो ग्राहक मिळतील. पण हातात काही चावी मिळत नाही. प्रोजेक्टकडे फेऱ्या मारूनही ते पूर्ण होण्याची वाट पाहावी लागते. अनेकदा तर अपूर्ण अवस्थेतच शेवटपर्यंत घर पाहण्याची वेळ येते. अशा स्थितीत घर विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. खर्चाचा अंदान न बांधणे : बरेच जण घर खरेदी करण्यापूर्वी फक्त फ्लॅटची किंमतच डोक्यात ठेवतात....