
आपल्या परंपरेत लग्न म्हणजे सात जन्मांचे बंधन मानल्या जाते. दोन जिवांचे ते मिलन आहे. यामध्ये कुटुंब, आप्तेष्ट, समाज यांच्या साक्षीने दोघे जन्मजन्मांतराच्या पवित्र बंधनात बांधले जातात. हा लग्न सोहळा म्हणजे जन्मभराची आठवणच असतो. येथे नवीन नाती गुंफली जातात. कुटुंब लग्न सोहळ्यात रमते. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतात. ढोल, ताशे, डीजेवर नाचणाऱ्या तरुण मंडळींपासून, ते आबा, काका, रावसाहेबांपर्यंत अनेक दिग्गज आपसूकच या विवाहसोहळ्यात थिरकतात. आनंद, जल्लोष, पावित्र्य अशा विविध रंगांची कोण उधळण होते. खास कपडे घालून अनेक जण मिरवतात. थाटमाट, सरबराई, आदरातिथ्य, स्वादिष्ट भोजण असं रंगबिरंगी उधळण म्हणजे लग्न असतं. पण आता लग्नाचा नवीन ट्रेंड रूजू होत आहे. खोट्या लग्नाची मोठी गोष्ट संपूर्ण देशात व्हायरल होत आहे. तुम्ही केवळ पैसे भरायचे आणि लग्नात नाचायचं, मिरवायचं, धमाल मस्ती करायची, कोणता आहे हा ट्रेंड, जाणून घ्या.. बनावट लग्नाचा ट्रेंड व्हायरल ...