विदेशी गुंतवणुकदारांच्या माघारीमुळे अन् सोन्यातील घसरणीमुळे परकीय चलनाचा साठा घटला, आरबीआयच्या तिजोरीत किती आहे गंगाजळी?

| Updated on: Mar 26, 2022 | 1:04 PM

रिझर्व्ह बँकेच्या साठवणीत सोने जमा आहे. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा 1.7 अब्ज डॉलरने घसरून 42 अब्ज डॉलरवर आला आहे.

विदेशी गुंतवणुकदारांच्या माघारीमुळे अन् सोन्यातील घसरणीमुळे परकीय चलनाचा साठा घटला, आरबीआयच्या तिजोरीत किती आहे गंगाजळी?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Image Credit source: Wikipedia
Follow us on

मुंबई :  या आठवड्यातही देशाच्या (foreign exchange) परकीय चलनाच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री केली, त्यामुळे या आठवड्यात देशातील परकीय चलनाचा साठा 2.6 अब्ज डॉलरने घसरून 619.6 अब्ज डॉलरवर आला. गेल्या आठवड्यात त्यात 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली होती. (War) रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे चलन बाजारातील अस्थिरता खूप जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने (Dollar) डॉलरची विक्री केली आहे.रिझर्व्ह बँकेच्या साठवणीत सोने जमा आहे. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा 1.7 अब्ज डॉलरने घसरून 42 अब्ज डॉलरवर आला आहे. परकीय चलन मालमत्ता (FCA) 703 दशलक्ष डॉलर्सने घसरून 553 दशलक्ष डॉलर्सवर आली आहे.

सोन्यात सातत्याने घसरण

या आठवड्यात एमसीएक्सवर (MCX) एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 51,888 रुपयांवर बंद झाला आहे. जून महिन्याच्या डिलिव्हरीसाठी सोने 52,381 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला. रशिया- युक्रेनच्या युद्ध संकटात 8 मार्च रोजी एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याने 55,558 रुपये प्रति दहा ग्रॅम ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत आहे. जून डिलिव्हरीसाठी सोने 56,163 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर त्यातही सातत्याने घट होत आहे.

म्हणून बाजारात वाढला दबाव

विदेशी गुंतवणुकदारांनी बाजारातून काढता पाय घेतल्याने रुपयावर बाजारात दबाव वाढला. त्याचा परिणाम म्हणून रुपयाचे अवमूल्यन टाळण्यासाठी आणि रुपया मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री करून चलनाचे मूल्य टिकवून ठेवते. शेअर बाजारातून परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सातत्याने विक्री करत असल्याने, त्यामुळे डॉलरने बाहेरचा रस्ता धरला होता. त्यामुळेच रुपया मजबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलरचा साठा विकावा लागला. मात्र, गेल्या काही व्यापारी सत्रांपासून परदेशी गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. विदेशी गुंतवणुकदारांनी खरेदी केल्याने रुपया मजबूत होईल, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. पुढील काही आठवड्यांत रुपया 76 पातळीवर पोहोचू शकेल, असे रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले.

या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 76.22 वर बंद झाला.

विदेशी बाजारांमध्ये अमेरिकी चलन कमकुवत होत असताना आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहाराअंती रुपया 11 पैशांनी वधारून 76.22 प्रति डॉलरवर बंद झाला.आंतरबँक परकीय चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 76.15 वर उघडला. व्यापारादरम्यान रुपयाने दिवसभरातील उच्चांकी 76.12 रुपये आणि 76.29 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारी रुपया 6 पैशांनी वधारुन 76.33 प्रति डॉलरवर बंद झाला होता.

संबंधित बातम्या :

दिलासादायक! राज्यात सीएनजी होणार स्वस्त, व्हॅट कपातीची अधिसूचना जारी

Gold, silver prices : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदीही दीड हजारांनी महागली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

इंधनाच्या किमतींमध्ये आज पुन्हा वाढ; पाच दिवसांमध्ये पेट्रोल 3.20 रुपयांनी महाग, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव