FD पेक्षाही जास्त फायदेशीर 4 योजना, चांगला परतावा मिळवण्यासोबत अनेक सुविधा, वाचा कशी करणार गुंतवणूक

FD पेक्षाही अधिक फायदा मिळवून देणाऱ्या अशाच 4 प्रमुख योजनांचा हा आढावा.

FD पेक्षाही जास्त फायदेशीर 4 योजना, चांगला परतावा मिळवण्यासोबत अनेक सुविधा, वाचा कशी करणार गुंतवणूक
Money
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 8:38 PM

नवी दिल्ली : दैनंदिन आयुष्यात बचतीला फार महत्त्व आहे. या बचतीसाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबतो. त्यातील अनेकजण सुरक्षित पर्याय म्हणून फिक्स डिपॉझिटचा (FD) पर्याय निवडतात. ही एक प्रचलित गुंतवणुकीची योजना आहे. मात्र, सध्या या योजनेत गुंतवणुकीवर मिळणारे व्याज दर कमी झालेत. त्यामुळे अधिक चांगल्या परताव्यासाठी चांगलं व्याजदर असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं अधिक व्यावहार्य ठरणार आहे. तसं केलं तरच कोरोनाच्या आर्थिक तंगीच्या काळात तुम्हाला अधिक चांगला परतावा मिळेल. FD पेक्षाही अधिक फायदा मिळवून देणाऱ्या अशाच 4 प्रमुख योजनांचा हा आढावा (Four better schemes which will give good returns than FD on investment).

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC)

पोस्ट ऑफिसकडून चालवल्या जाणाऱ्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत मिळणारं व्याजदर हे एफडीपेक्षा जास्त आहे. सध्या या योजनेत जवळपास 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळतं. या योजनेत तुम्ही कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा या योजनेला नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावरही ही योजना सुरु करु शकता. याशिवाय यात जॉईंट अकाउंट देखील काढण्याची सोय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास कर कायद्यातील कलम 80C नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत आहे.

किसान विकास पत्र (KVP)

पोस्ट ऑफिसची आणखी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय योजना म्हणजे ‘किसान विकास पत्र’. या योजनते गुंतवणुकदाराला 6.9 टक्के व्याजदराने नफा मिळतो. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीतकमी 18 वर्षे वय असणं आवश्यक आहे. या योजनेत देखील एकट्याच्या नावे किंवा दोघांच्या नावे गुंतवणूक करता येते. या योजनेत मुलांच्या नावे देखील खातं सुरु करता येतं. अशा स्थितीत पालक मुलांच्यावतीने व्यवहार करु शकतात. जर तुम्हाला या योजनेतील पैसे काढायचे ठरले तर तुम्ही 2.5 वर्षांनंतर आपले पैसे परतही घेऊ शकता. या योजनेत कमीतकमी गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आहे.

मंथली इनकम स्कीम (MIS)

मंथली इनकम स्कीम देखील पोस्ट विभागाचीच आहे. या योजनेत गुंतवणुकीवर 6.6 टक्के व्याजदर मिळते. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये भरुन खातं सुरु करता येतं. या योजनेमुळे तुम्हाला दैनंदिन उत्पन्नाची व्यवस्था होऊ शकते. जर तुमचं खातं एकट्या व्यक्तीचं असेल तर तुम्ही 4.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकता. तुमचं खातं ज्वाइंट प्रकारचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही योजना पूर्ण होऊन परतावा मिळण्यासाठीचा कालावधी 5 वर्षे आहे.

टाईम डिपॉजिट स्कीम

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉजिट स्कीम एकप्रकारची फिक्स डिपॉजिट स्कीम (FD) आहे. यामध्ये एक विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. ही गुंतवणूक 1 ते 5 वर्षांसाठी असेल तर त्या गुंतवणुकीवर 5.5 ते 6.7 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळते. याशिवाय कर कायद्याच्या कलम 80 सी नुसार करातूनही सवलत मिळते. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीतकमी वयाची अट 18 वर्षे आहे. या योजनेत कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

Four better schemes which will give good returns than FD on investment

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.