RESIGNATION SURVEY: नोकरी नको, उद्योग बरा; नोकरदार वर्गात राजीनाम्याची लाट

| Updated on: Jun 20, 2022 | 6:31 PM

एका सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 4 कर्मचारी वेतन वाढीनंतर आपल्या वर्तमान संस्थेतून राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. सेवा क्षेत्रात नोकरी बदलण्याचा वेग सर्वाधिक असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

RESIGNATION SURVEY: नोकरी नको, उद्योग बरा; नोकरदार वर्गात राजीनाम्याची लाट
नोकरी
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली- कोविड प्रकोपाच्या (COVID CRISIS) काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार होती. अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झालं असल्यानं अनेकांना नोकरीवरुन डच्चू देण्यात आला. तसेच अनेकांच्या वेतनाला थेट कात्री लावण्यात आली होती. कोविड निवळल्यानंतर पुन्हा सर्व क्षेत्रांनी उभारी घेतली आहे. कर्मचाऱ्यांत नोकरी बदलण्याचा ट्रेंड (JOB CHANGE TREND) जोर धरू लागला आहे. आगामी काळात नोकरी बदलण्याच्या ट्रेंडला वेग येईल असं चित्र सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एका सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 4 कर्मचारी वेतन वाढीनंतर आपल्या वर्तमान संस्थेतून राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. सेवा क्षेत्रात नोकरी बदलण्याचा वेग सर्वाधिक असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सेवा क्षेत्रातील (SERVICE TREND) तब्बल 37 टक्के कर्मचारी वेतनवाढ केल्यानंतर नोकरी बदलू इच्छिता. उत्पादन क्षेत्रातील 31 टक्के कर्मचारी आणि आयटी क्षेत्रातील 27 टक्के कर्मचारी वर्तमान नोकरीचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे.

दी ग्रेट रेजिग्नेशन सर्वेक्षणात विविध क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वेक्षणात विविध क्षेत्रातील 500 हून अधिक संस्थांना सहभागी करण्यात आलं होतं. वेतन वाढीचं संथ प्रमाण हे राजीनामा देण्यामागील प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. सर्वेक्षणात सहभागी केवळ 15 टक्के व्यक्तींच्या राजीनाम्याच्या मागे रिपोर्टिंग मॅनेजर संबंधित कारण असल्याचं दिसून आलं आहे.

प्रमुख कारणं राजीनाम्याची:

· वेतनवाढीचा संथ वेग- 54.8%

हे सुद्धा वाचा

· काम-नोकरीचं संतुलन- 41.4%

· करिअर ग्रोथ- 33.3%

· स्वत:ची ओळख न बनणं- 28.1%

नोकरी नको, उद्योग हवा

सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, नोकरी सोडण्याच्या विचार करू इच्छिणाऱ्या 10 पैकी 1 व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिता. 30-45 वर्षे वयाचे व्यक्ती उद्योजक बनू इच्छिता. 44 टक्के कर्मचारी तत्काळ राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नाही. मात्र, स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिता.

वेतनवाढ हवी

उत्पादन व सेवा क्षेत्रातील कर्मचारी उद्योजक बनण्याच्या मानसिकतेत आहे. सर्वेक्षणात सहभागी प्रत्येक तिसरा व्यक्ती 40 टक्के आणि अधिक वेतन वाढीची अपेक्षा व्यक्त करीत आहे. अपेक्षित वेतनवाढ न मिळाल्यामुळे नाराज कर्मचाऱ्यांच्या टक्क्यांत दिवसागणिक भर पडत आहे.