Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांना धक्का, या अरबपतीने घेतली मोठी झेप, मग एलॉन मस्क यांचा नंबर घसरला का?

| Updated on: Jan 12, 2023 | 5:10 PM

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचे स्थान घसरले. मुकेश अंबानी यांचे यादीत आगेकूच?

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांना धक्का, या अरबपतीने घेतली मोठी झेप, मग एलॉन मस्क यांचा नंबर घसरला का?
यादीत घसरण
Follow us on

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या श्रीमंतांच्या यादीतील (Billionaires Index) स्थानाला धक्का लागला आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचे स्थान घसरले आहे. अदानी यांची आगेकूच पाहता, ते लवकरच या यादीत अग्रस्थान पटकावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचे स्थान घसरून ते चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेले. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीत 91.2 कोटी डॉलरची घसरण दिसून आली. आता ही संपत्ती 118 अरब डॉलर राहिली आहे. 2022 मध्ये अदानी यांच्या एकूण भांडवलात 44 अरब डॉलरची भर पडली होती. वार्षिक आधारावर अदानी यांच्या संपत्तीत 2.44 अरब डॉलरची घसरण झाली.

अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी मोठी झेप घेतली आहे. त्यांनी अदानी यांना मागे ढकलत या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. बेझोस यांच्या संपत्तीत 5.23 अरब डॉलरची भर पडली आहे. ही संपत्ती आता 118 अरब डॉलरवर पोहचली आहे.

ब्लूमबर्गतर्फे आज जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये फ्रांसचे उद्योजक बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) 182 अरब डॉलरच्या संपत्तीसह या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. 2022 मध्ये त्यांच्या संपत्तीत एकूण 20 अबर डॉलरची भर पडली.

हे सुद्धा वाचा

सध्या एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या विविध प्रयोगामुळे आणि ट्विटरमधील त्यांच्या बेधडक निर्णयामुळे ते सध्या प्रसिद्धी झोतात आहे. त्यांचे हे प्रयोग अंगलट असून त्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. मस्क 132 अरब डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत.

मस्क हे संपत्तीबाबतीत बर्नार्ड अरनॉल्ट यांच्यापेक्षा खूप पिछाडीवर आहेत. मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसापूर्वी 2.78 अरब डॉलरची भर पडली होती. परंतु, या संपूर्ण वर्षात त्यांच्या संपत्तीत 4.84 अरब डॉलरची घसरण दिसून आली.

श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोस 118 अरब डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत बुधवारी 2.44 अरब डॉलरची घसरण झाली. ते आता चौथ्या स्थानी आहेत. वॉरेन बफेट 111 अरब डॉलर सह पाचव्या, बिल गेट्स सहाव्या, लॅरी एलिसन सातव्या, तर मुकेश अंबानी हे 87.6 अरब डॉलर संपत्तीसह आठव्या स्थानी आहेत.