Gautam Adani : गौतम अदानी यांच्या नावाने या शेअरला सोन्याचे दिवस, तीनच दिवसांत 15 टक्के वधारला

Gautam Adani : गौतम अदानी यांच्यामुळे या शेअरला सोन्याचे दिवस आले आहेत.

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या नावाने या शेअरला सोन्याचे दिवस, तीनच दिवसांत 15 टक्के वधारला
परिसस्पर्श
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 9:09 PM

नवी दिल्ली : पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडियाच्या (PTC India) शेअर्सनी सलग तिसऱ्या दिवशी कमाल दाखवली आहे. शेअर बाजारात (Share Market) चढउतार सुरु आहे. गेल्या आठवड्यात तर अनेक गुंतवणूकदारांना बाजाराने आसमान दाखवले होते. पण अशा परिस्थितीतही पीटीसी इंडियाच्या शेअरने कमाल केली आहे. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) हे या कंपनीत गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरने तिसऱ्या दिवशी 5 टक्क्यांचे अपर सर्किट लावले आहे.

गौतम अदानी यांच्या नावाच्या चर्चेनंतर या शेअरमध्ये मोठी हालचाल दिसून आली. या शेअरने तीनच दिवसात मोठी उसळी घेतली. हा शेअरने तीनच दिवसात 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. या कंपनीत सरकारी वीज कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे.

अदानी समूहासह इतर ही कंपन्या या पीटीसीमध्ये वाटेकरी होण्याच्या तयारीत आहेत. अदानी समूह (Adani Group) ही कंपनी खरेदी करण्यासाठी मोठी योजना आखत आहे. त्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. इतर कंपन्याही पीटीसीत हिस्सेदारीसाठी इच्छुक आहेत.

हे सुद्धा वाचा

पीटीसी इंडियाच्या प्रवर्तक कंपन्यांमध्ये एनटीपीसी लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या त्यांचा 4 टक्क्यांचा वाटा विकण्याच्या तयारीत आहेत.

पीटीसी इंडियाचा शेअर आज 3.38 टक्क्यांच्या वृद्धीसह 94.90 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यानंतर त्यामध्ये 4.96 टक्क्यांची वृद्धी झाली आणि तो 96.35 रुपयांवर पोहचला. हा शेअर त्याच्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजपेक्षा जास्त ट्रेड करत आहे.

गेल्या वर्षी या शेअरसाठी लक्की ठरले नाही. या शेअरमध्ये 11.12% घसरण दिसून आली. यावर्षात हा शेअरमध्ये 18.8% वृद्धी दिसून आली. या कंपनीचा मार्केट कॅप 2,852.04 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 32.26 टक्क्यांची घसरण झाली. हा नफा केवळ 119.79 कोटी रुपये राहिला.

तर गेल्यावर्षीच समान तिमाहीत या कंपनीने 177.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. अदानी हे भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांचे नाव या कंपनीशी जोडल्या गेल्याबरोबर पीटीसीच्या शेअरमध्ये वृद्धी दिसून आली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.