Tata Group : टाटा समूहाच्या नवरत्न कंपनीची 38 वर्षांत जोरदार कामगिरी, गुंतवणूकदारांचाही जिंकला विश्वास, भविष्यात हे आहेत खास प्लॅन

Tata Group : टाटा समूहातील या कंपनीची जोरदार घौडदौड सुरु आहे.

Tata Group : टाटा समूहाच्या नवरत्न कंपनीची 38 वर्षांत जोरदार कामगिरी, गुंतवणूकदारांचाही जिंकला विश्वास, भविष्यात हे आहेत खास प्लॅन
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 7:05 PM

नवी दिल्ली : टाटा समूहाची (Tata Group) भरभराट सर्वांनाच माहिती आहे. त्यातील अनेक कंपन्यांवर ग्राहकांचा डोळे झाकून विश्वास आहे. टाटाने नावच नाहीतर विश्वास कमावला आहे. टाटाच्या टायटन (TITAN) या कंपनीने 38 वर्षांत जोरदार घौडदौड केली आहे. टायटन घड्याळांनी अनेकांना भूरळ घातली आहे. तर अनेक कार्यालये, घरांच्या भिंतीवर ही घड्याळं दिमाखात वेळेचे गणित सांगत आहेत. जवळपास चार दशकांपूर्वी टायटन वॉचेस लिमिटेड (TITAN Watches Limited) या नावाने ही कंपनी सुरु झाली होती. घड्याळासोबत या कंपनीचे इतर ही अनेक उत्पादने आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध (Share Market Listed) झाल्यावर या कंपनीने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर जोरदार कमाई करुन दिली आहे. झुनझुनवाला कुटुंबाने ही या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीचा एकूण महसूल 29,033 कोटी रुपये होता. सध्या टायटनचा मार्केट कॅप 2.20 लाख कोटी रुपये आहे. 8 जानेवारी 2023 रोजी कंपनीचा शेअर जवळपास 2500 रुपये होता. सध्या कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्नरत आहे.

टायटन कंपनीने व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योजना आखली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये तिमाही आकडेवारीने या विस्तारीकरणाचा वेग दिसून येतो. गेल्या तिमाहीत या कंपनीचे देशभरात आणखी 111 नवीन रिटेल आऊटलेट उघडले आहेत.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत या कंपनीने 36 नवीन आई+ स्टोअर उघडले आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपनीचा एकूण नफा 33 टक्के वाढून तो 857 कोटी रुपये होता. या नफ्यात दरवर्षी वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत कंपनीच्या अनेक योजना आहेत.

घड्याळ आणि इतर विभागात या कंपनीने 14 टक्क्यांची वृद्धी नोंदवली आहे. तर आयकेअर सेगमेंटमध्ये विक्रीत 10 टक्के वार्षिक वृद्धी झाली आहे. कंपनीत सध्या 7,000 कर्मचारी काम करत आहेत. विस्तार योजनेत रोजगार संधी मिळण्याची शक्यता आहे.

बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांनी 2002-03 मध्ये या कंपनीचा शेअर केवळ 3 रुपयांना खरेदी केली होता. 9 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचा शेअर दुपारी 02:11 वाजता 2474 रुपयांवर व्यापार करत होता. भविष्यात या कंपनीच्या अनेक योजना आहेत. वेळोवेळी त्यासंबंधीची माहिती अपडेट होत राहिल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.