Gautam Adani : कोण आहे गौतम अदानी यांची डॉक्टर पत्नी? अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारले मोठे सेवा कार्य

| Updated on: Feb 03, 2023 | 10:17 AM

Gautam Adani : अदानी समूहावर संकटाचे गडद ढग जमा होत असले तरी सामाजिक कार्यातही त्यांचा ग्रूप सक्रिय आहे.

Gautam Adani : कोण आहे गौतम अदानी यांची डॉक्टर पत्नी? अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारले मोठे सेवा कार्य
Follow us on

नवी दिल्ली : भारतात अनेक मोठ्या उद्योगपतींचे कुटुंबिय सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. उद्योगपतींनी त्यांची आई-वडिल अथवा समूहाच्या नावे फाऊंडेशन स्थापन केले आहेत. या समूहाच्या मार्फत देशात विविध सामाजिक कार्य करण्यात येते. गोरगरिबांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी हे फाऊंडेशन झटत आहे. अदानी समूहावर (Adani Group) सध्या संकटाचे ढग गडद झाले आहेत. बाजारातून एफपीआय मागे घ्यावा लागला आहे. तसेच गुंतवणूकदारांचाही त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची बाजू मात्र तितकीशी समोर आलेली नाही. गौतम अदानी यांची पत्नी प्रिती अदानी (Dr. Priti Adani) यांनी अदानी फाऊंडेशनच्या (Adani Foundation) माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभारलं आहे.

अदानी फाऊंडेशनच्या माध्यमामतून अनेक सेवा कार्य सुरु आहेत. 1996 मध्ये प्रिती अदानी यांनी फाऊंडेशची जबाबदारी खाद्यांवर घेतली. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. 1988 मध्ये अदानी समूहाची स्थापना झाली होती. गौतम अदानी, त्यांची पत्नी प्रिती आणि दोन मुलं करण आणि जीत असा हे कुटुंब आहे.

प्रिती अदानी यांचा जन्म 1965 मध्ये मुंबईत झाला होता. त्यांनी अहमदाबाद सरकारी दंतवैद्य महाविद्यालयातून पदवी संपादित केली आहे. गौतम अदानी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी दंत वैद्य म्हणून व्यावसायिक काम करणे बंद केले. त्यांनी अदानी फाऊंडेशनचे काम सुरु केले.

हे सुद्धा वाचा

गुजरातमध्ये शिक्षण क्षेत्रात अदानी फाऊंडेशनचे मोलाचे योगदान आहे. सीएसार निधीतून या फाऊंडेशनचे कार्य चालते. गुजरातमध्ये साक्षरता वाढीसाठी या उद्योग समूहाने मोठे कार्य उभारले आहे. 2018-19 मध्ये या फाऊंडेशनने 128 कोटी रुपये खर्च केले आहे.

सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रिती अदानी यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य करीत आहेत. देशातील 18 राज्यांतील 2300 गावांमध्ये अदानी फाऊंडेशनचे काम सुरु आहे.

प्रिती अदानी या गरिबी, निरक्षरता, कुपोषण याविरोधात काम करीत आहेत. उत्थान, स्वच्छाग्रह, सक्षम आणि सुपोषण या कार्यक्रमामार्फत अदानी यांचे सेवा कार्य जोरात सुरु आहे. अदानी समूह या कार्यक्रमासाठी भरभरून निधी देत आहे.

प्रिती अदानी यांनी दंतवैद्य म्हणून पदवी मिळवली तर व्यवसायाच्या धावपळीत गौतम अदानी यांना वाणिज्य पदवी ही पूर्ण करता आली नाही. पण प्रिती यांच्या आईचा आग्रह होता, त्यामुळे हे लग्न जुळून आले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होती. सप्टेंबरपासून आतापर्यंत गौतम अदानी 86 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती गमावली. गौतम अदानी यांनी आतापर्यंत बुल्गेरियाचा जीडीपी इतकी संपत्ती गमावली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांनी यावर्षी आतापर्यंत जवळपास 50 अब्ज डॉलरची एकूण संपत्ती गमावली. केवळ एका दिवशी त्यांची एकूण 15 अब्ज डॉलर संपत्ती घटली. त्यांची एकूण संपत्ती 64 अब्ज डॉलर पेक्षा कमी झाली.