Gautam Adani Net Worth : गौतम अदानी यांची मोठी झेप! दोन तासात संपत्तीत 11 अंकी वाढ

| Updated on: Mar 04, 2023 | 4:44 PM

Gautam Adani Net Worth : हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी साम्राज्यात आता कुठं प्रकाश येऊन धडकला आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सने उसळी घेतली. समूहाच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली. आता अदानी यांनी कमबॅक केले असले तरी ते ताकदीने गतवैभव मिळवणार का, असा प्रश्न आहे.

Gautam Adani Net Worth : गौतम अदानी यांची मोठी झेप! दोन तासात संपत्तीत 11 अंकी वाढ
कमबॅक
Follow us on

नवी दिल्ली : हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report)अदानी साम्राज्यात आता कुठं प्रकाश येऊन धडकला आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सने (Gautam Adani Shares) उसळी घेतली. हिंडनबर्ग अहवालाने गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठं भगदाड पाडलं. 24 जानेवारी 2023 रोजी अहवाल आला. त्यानंतर अदानी समूहात जोरदार पडझड सुरु झाली. अदानी समूहाने अनियमितता आणि शेअर्सचे बाजारातील मूल्य वाढविल्याचा आरोप हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचे शेअर्स कोसळले. जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पडझड झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी टॉप-30 मधून बाहेर फेकले गेले. पण आता त्यांनी शेअर बाजारात कमबॅक केले आहे. दोन तासात अदानी समूहाचे मार्केट कॅप (Adani’s Market Cap) 3,94,76,40,00,00 इतके वाढले आहे.

शेअर बाजारातही अदानी समूहाच्या शेअर्सने कमाल केली आहे. बीएसई निर्देशांकावर 899.62 वरुन शेअर 59,808.97 पाईंट्सवर पोहचला. गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहासाठी चांगल्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे सेबी आणि आरबीआयने मात्र अदानी समूहावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी महिन्याभरापूर्वी अदानी समूहाकडे पाठ फिरवली होती. आता ते पुन्हा अदानी समूहाकडे आले तर त्यांचे पारडे अजून जड होऊ शकते.

दरम्यान अमेरिकेतील एका फर्मने अदानी समूहावर विश्वास दाखवत, त्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. अदानी समूहाने, अदानी पोर्ट्स ॲंड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी ट्रांसमिशन लिमिटेड (ATL) आणि अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (AEL) या सूचीबद्ध कंपन्यांतील शेअर बाजारात विक्री केले. जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकन कंपनीने हा सौदा केला आहे. ही कंपनी अदानी समूहातील गुंतवणूकदार झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी समूहावर 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामधील जवळपास 8 टक्के कर्ज पुढील आर्थिक वर्ष संपेपर्यंत चुकते करायचे आहे. विक्रीपूर्वी एईएलमध्ये प्रवर्तकांचा 72.6 टक्के हिस्सा होता. यातील 3.8 कोटी शेअर्स किंवा 3.39 टक्के भागभांडवल 5,460 कोटी रुपयांना विक्री झाले. APSE मध्ये प्रवर्तकांचा 66 टक्के हिस्सा होता आणि त्यांनी 8.8 कोटी समभाग अथवा 4.1 टक्के भागभांडवल 5,282 कोटी रुपयांना विकले.

अदानी समूहाला येत्या महिन्यात 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे कर्ज चुकते करायचे आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे. समूह कर्ज चुकविण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा तर विकणारच आहे. पण ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीवर कर्ज मिळण्यासाठी चाचपणी करणार आहे. मोठ्या रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी कंपनी सध्या पर्याय शोधत आहे. सध्या शेअर बाजारातील सूचीबद्ध असलेल्या चार कंपन्यांमधील काही हिस्सा विक्री करण्यात आला आहे.