
आता १० मिनिटांत तुम्हाला तुमच्या घरात वस्तू आणून देणाऱ्या डिलिव्हरी बॉयवरील १० मिनिटांच्या ऑर्डर पोहचवण्याचे निर्बंध हटवण्यात आले आहे. देशभरातील गिग वर्कर्सच्या निदर्शनांना अखेर यश आले आहे. सरकारने आता डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेसंदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. या कामगारांच्या मागण्यांची सरकारने दखल घेतल्यानंतर ऑनलाईन ऑर्डरमधून १० मिनिटांचा डिलिव्हरीचा नियम हटवण्यात आला आहे. कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्तक्षेपानंतर Blinkit ने त्यांच्या सर्व ब्रँडमधून १० मिनिटांच्या डिलिव्हरीचे आश्वासन हटवले आहे.
या मुद्यांवर केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया यांनी ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देत वेळेच बंधन हटवले आहे.
सरकारने कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की वेगाने डिलिव्हरीच्या दबावात डिलिव्हरी बॉयच्या जीवाला जोखीम पडायला नको.
यानंतर सर्व कंपन्यांनी आश्वासन दिले आहे की त्यांच्या ब्रँडच्या जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टवरुन डिलिव्हरीच्या वेळेची मर्यादा हटवण्यात येणार आहे.
१० मिनिटांच्या वेळेच्या बंधनामुळे डिलिव्हरी बॉयवर वेगाने डिलिव्हरी करण्याचा दबाव वाढला जातो. रस्ते अपघात आणि सुरक्षा जोखीम असते. या संदर्भात ३१ डिसेंबरच्या रात्री देशभरातील गिग वर्कर्सनी संप देखील पुकारला होता. डिलिव्हरी बॉयने सरकारला विनंती केली होती की त्यांच्या सुरक्षेसाठी काही पावले उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर सरकारने कंपन्यांशी बोलणी करुन आधी सुरक्षा महत्वाची असल्याने १० मिनिटांच्या डिलिव्हरीचे बंधन हटवण्याचा निर्णय घेतला.