Gold Price Today: सोनं स्वस्त होणार, सध्याच्या दरात मोठ्या घसरणीची शक्यता

| Updated on: Jun 28, 2021 | 10:36 AM

Gold price | यापूर्वी शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात 66 रुपयांची घसरण होऊन ते प्रतितोळा 46,309 रुपयांवर स्थिरावले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेतही सोने 47,000 रुपये प्रतितोळ्याच्या आसपास आहे.

Gold Price Today: सोनं स्वस्त होणार, सध्याच्या दरात मोठ्या घसरणीची शक्यता
जर कोणाला फिजिकल सोने हवे असेल तर ईजीआरला तिजोरीत सरेंडर करावे लागेल. वॉल्ट मॅनेजर ग्राहकाला EGR घेऊन फिजिकल सोने देईल, तिथे EGR रद्द होईल. रद्द केलेल्या ईजीआरची माहिती एक्सचेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कॉर्पोरेशनलाही पाठवली जाईल. वितरित केलेल्या सोन्याच्या गुणवत्तेवर वाद असल्यास, स्वतंत्र एजन्सीचा अहवाल वैध असेल.
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत असलेला सोन्याचा भाव आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा घसरला. सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दराची (Gold Rates) खालच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये सोन्याचा भाव आणखी खाली येऊ शकतो. (Gold and Silver price Today)

यापूर्वी शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात 66 रुपयांची घसरण होऊन ते प्रतितोळा 46,309 रुपयांवर स्थिरावले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेतही सोने 47,000 रुपये प्रतितोळ्याच्या आसपास आहे. मात्र, सोमवारी चांदीच्या दरात मात्र उसळी पाहायला मिळाली. गेल्या सत्रातही चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे 332 रुपयांची वाढ झाली होती. सध्या चांदीचा प्रतिकिलो दर 67,248 रुपये इतका आहे.

सोन्याचा भाव अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर

गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. शुक्रवारी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याच्या दरात 86 रुपयांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोन्याचा प्रतितोळा दर 46956 रुपये इतका झाला होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. 14 एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा 46831 रुपये इतका होता. तर 15 एप्रिलला हाच दर प्रतितोळा 47401 रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याने देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येनच्या या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

(Gold and Silver price Today)