
56th GST Council Meeting Updates : देशभरातील सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी परिषदेची 56 वी बैठक झाली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर आणि ग्राहकांच्या खिशावर दिसेल. सोने-चांदीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांवर कराचा बोजा पडणार नाही. सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमती चढ्या असल्या तरी वायदे बाजारात MCX वर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. त्यात दोन जीएसटी स्लॅबचे धोरण ठरवण्यात आले. आता 5%, 12%, 18%, 28% हे चार टॅक्स स्लॅब नसतील. तर 5% आणि 18% हे दोन स्लॅब असतील. सोने आणि चांदीवर 3% GST आणि मेकिंग चार्ज 5% GST कायम आहे. म्हणजे सरकारने सोने आणि चांदीवर जीएसटी वाढवला नाही.
सोने-चांदी झाले स्वस्त
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) ताज्या आकडेवारीनुसार, सोने आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 1,05,750 रुपयांवर आले. जवळपास 271 रुपयांची घसरण आली. 23 कॅरेट सोने 1,05,330 रुपये, 22 कॅरेट सोने 96,870 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 79,310 रुपये, 14 कॅरेट सोने 61,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,22,900 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
गुंतवणूकदारांसाठी काय खास?
तज्ज्ञांच्या मते, GST परिषदेच्या या सुधारणांमुळे सोने-चांदीतील गुंतवणूक वाढेल. मौल्यवान धातुवरील जीएसटी वाढवण्यात आला नाही. 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांना कराबाबत तरी दिलासा मिळाला आहे. सोने हे कठीण आणि अनिश्चित काळात सर्वात विश्वसनीय गुंतवणूक म्हणून ओळखले जाते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.