मीही अनेक गोष्टी सांगू शकतो…, शरद पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांचा सूचक इशारा, थेट म्हणाले…
शनिवारी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं, 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र त्यापूर्वी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथग्रहण सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, त्यासंदर्भात आपल्याशी चर्चा देखील झाली नाही असा दावा केला, तसेच बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय, मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर कारयाचे, असा सूचक इशाराच यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मी यामध्ये दोनच गोष्टी सांगेल खरं म्हणजे ही बोलण्याची वेळ नाहीये. पण मी यामध्ये दोनच गोष्टी सांगेल. समजा अजित पवार हे अशा कुठल्याही प्रकारच्या एकत्रिकरणाची चर्चा करत होते. तर अशी कुठलीही चर्चा ते भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे जर त्यांनी विलिनीकरणाची चर्चा केली असेल तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असेल, जर त्यांनी तशी कोणतीच चर्चा केली नसेल तर मग भाग वेगळा, मी पुन्हा एकदा सांगतो, मला असं वाटतं की चर्चा करायची, नाही कारायची विलिनीकरण करायचं नाही करायचं हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल, आमची फक्त एवढीच अपेक्षा असेल की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. तशी ते चर्चा करतील.
आणि दुसरं जर समजा अजित पवार अशा पद्धतीच्या चर्चा करत होते, तर ते काय एनडीएममधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? सरकारमधून बाहेर पडण्यासाठी चर्चा करत होते का? ते तर सरकारमध्ये स्टेबल होते, उगच काही तरी संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर आपली इको स्टिस्टिम वापरून तो संभ्रम इको कारायचा, ही पद्धत अयोग्य आहे, योग्य नाहीये. कसं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय हे मला सगळं दिसतंय, मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हाला माहिती आहे, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे, माझ्याशी शेअर कारयाचे, त्यांचा मृत्यू झाला, त्यापूर्वी जवळपास एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की, खालच्या स्थराचं राजकारण करणं योग्य नाही, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
