AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?

मुस्लीम समाजाने अभिनेत्रीला इस्लाम बाहेर करण्याचा निर्णय घेतलाय... प्रसिद्ध अभिनेत्री इस्लाममधून हकालपट्टी... 'या' धर्मात जाणार? काय म्हणाली अभिनेत्री..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
| Updated on: Feb 01, 2026 | 3:56 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री तिच्या धर्मामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दावा केला होता की मुस्लिम समुदायाने उर्फी जावेदला इस्लाममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे नाव आता गीता भारद्वाज असेल. अशात उर्फी हिने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. उर्फी म्हणाली, ‘मी स्वतः आधीच धर्म सोडलेला आहे. आता असं कोण म्हणत आहे?’ स्वतःचं नाव गीता भारद्वाज ठेवण्याच्या चर्चांवर उर्फी म्हणाली, ‘हे कोणी म्हणालं? असा कोणताच रिपोर्ट नाही… हे लोक स्वतःहून हे बनवत आहेत. मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. मी नास्तिक आहे. मग तुम्ही मला कुठे हाकलून लावणार आहात? तुम्ही मला अशा ठिकाणाहून हाकलून लावणार आहात जिथे मी सुरुवाती पासूनच नाही.’, असं देखील उर्फी म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, 31 जानेवारी रोजी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दावा करत एक व्हिडीओ पोस्ट केलेला. ‘इस्लाम धर्मातून तिला काढून टाकण्यात आलं आहे’ आणि आता ती गीता भारद्वाज म्हणून ओळखली जाईल. व्हिडिओमध्ये त्याने आरोप केला आहे की, उर्फीने वारंवार मुस्लिम समुदायाचा अपमान केल्यानंतर, ‘मुस्लिमांनी’ तिला समुदायातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला.

व्हिडीओ पोस्ट करत फैजान अन्सारी म्हणालेला, ‘नमस्कार मित्रांनो… मी फैजान अन्सारी… एक मुलगी आहे, जी फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगात मुस्लीम धर्माचं नाव खराब तर आहे. तिचा कुरानवर विश्वास नाही. आणि मुस्लीम धर्मावर देखील विश्वास नाही… आतापर्यंत तिचं नाव उर्फी जावेद असं होतं… ती एक अतिशय वाईट मुलगी आहे जिने जगभरातील मुस्लिमांचे नाव कलंकित केलं आहे आणि प्रत्येक मुस्लिम तिला शिव्या देत आहे. ‘

पुढे फैजान अन्सारी म्हणाला, ‘अखेर मुस्लीमांनी निर्णय घेतला आहे की, आता उर्फी मुस्लीम नाही.. मी यासाठी अखिल भारतीय मुस्लिम समुदायाचे प्रमुख मौलाना यांना पत्र लिहिलं आहे. मी त्यांची परवानगी मागितलेली नाही; मी त्यांना फक्त एवढंच कळवलं आहे की उर्फी जावेद आता मुस्लिम नाही. मुस्लीम समाजाशी तिचा कोणताच संबंध नाही… तिचं नाव आता गीता भारद्वाज आहे.’, असं देखील फैजान अन्सारी म्हणालेला आहे.

उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, याआधी देखील उर्फी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उर्फी कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील उर्फी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकांना उर्फी हिची स्टाइल आवडते अनेक तिला विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर