AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2026 : दारू महागली, आता किती पैसे मोजावे लागतील; रेट ऐकून एका झटक्यात उतरेल

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अल्कोहोलच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे मद्यपान करणाऱ्यांचा खर्च वाढला आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ देखील महाग झाले आहेत. अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत सरकारने मधुमेह आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

Budget 2026 : दारू महागली, आता किती पैसे मोजावे लागतील; रेट ऐकून एका झटक्यात उतरेल
alcoholImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 3:56 PM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, 1 फेब्रुवारी रविवारी संसदेत सलग नववा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पाचे भाषण संपल्यानंतर सामान्य लोकांची सर्वात मोठी उत्सुकता ही आहे की, आता कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तूंवर खर्च वाढणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चला जाणून घेऊया, कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या महाग झाल्या.

सिगारेट, तंबाकू महाग होणार

देशात मद्यपान करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे दारुच्या किंमती वाढल्याने लोकांच्या खिशावर थेट परिणाम होईल आणि त्यांना आवडत्या मद्यासाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत. आजपासून सिगारेट आणि तंबाकू उत्पादनांच्या किंमती वाढल्या आहेत, कारण यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी वाढवली आहे. नव्या नियमांनुसार ४०% GST सोबत अतिरिक्त सेस आणि एक्साइज शुल्क जोडले गेले आहे, तसेच सिगारेटवर प्रति स्टिक शुल्कही लागू केले आहे. याचा परिणाम असा होईल की, धूम्रपान करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये दारु स्क्रॅप आणि खनिजांच्या विक्रीवर टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS)चे दर १% वरून २% करण्यात आली आहे.

आवश्यक औषधांवर मोठा दिलासा

अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देताना सरकारने डायबिटीज आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांना स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. यामुळे उपचाराचा खर्च कमी होईल आणि लाखो रुग्णांना थेट फायदा मिळेल. सरकारचे मत आहे की, या पावलांमुळे आरोग्य सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि देशातील एकूण आरोग्य रचना मजबूत होईल.

स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या किंमती कमी होऊ शकतात

सरकारने मेक-इन-इंडिया मोहिमेला पुढे नेण्यासाठी देशात बनवलेल्या स्मार्टफोन आणि टॅबलेटसाठी सवलत दिली आहे. अर्थसंकल्पानंतर अशा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे एकीकडे घरगुती उत्पादनाला चालना मिळेल, तर दुसरीकडे ग्राहकांना कमी किंमतीत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल.

खेळाचे साहित्य स्वस्त होणार

युवा आणि खेळाडूंसाठीही अर्थसंकल्पात आनंदाची बातमी आहे. वित्तमंत्र्यांनी सांगितले की, खेळाच्या साहित्याला अधिक किफायतशीर बनवण्यावर सरकारचा भर राहील. याचा थेट परिणाम क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनसारख्या खेळांच्या सामानावर दिसेल आणि जास्त युवक खेळाकडे आकर्षित होतील.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना