AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये बडे साहब आहे तरी कोण? सेटवरील फोटो लीक होताच चर्चांना उधाण

'धुरंधर 2' या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सीक्वेलमध्ये बडे साहब कोण असेल, यावरून अंदात व्यक्त केला जात आहे.

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2'मध्ये बडे साहब आहे तरी कोण? सेटवरील फोटो लीक होताच चर्चांना उधाण
धुरंधर २ च्या सेटवरील फोटो लीकImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2026 | 3:58 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला थिएटरमध्ये 58 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरू आहे. थिएटरमधील कमाई थांबत नसतानाही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर येताच अवघ्या 24 तासांत हा भारतात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. यादरम्यान आता चाहत्यांमध्ये ‘धुरंधर 2’ या सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा सीक्वेल 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर यामधील ‘बडे साहब’ कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. अशातच ‘धुरंधर 2’च्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ लीक झाले आहेत. या फोटोंवरून बडे साहब कोण आहे, हे समजल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

‘धुरंधर’मध्ये अनेकदा ‘बडे साहब’चा उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्याचा चेहरा कधीच समोर आला नव्हता. चित्रपट संपल्यानंतरही ‘बडे साहब’चा सस्पेन्स टिकून राहतो. आता ‘धुरंधर 2’च्या सेटवरील फोटो लीक झाल्यानंतर बडे साहबच्या भूमिकेविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. लीक झालेल्या या फोटोमध्ये अर्जुन रामपाल आणि संजय दत्त दिसून येत आहेत. चित्रपटात संजय हा एसपी असलम चौधरीच्या भूमिकेत आहे, तर अर्जुनने आयएसआय मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये दोघं बाल्कनीमध्ये उभे राहून एकमेकांशी गप्पा मारताना दिसून येत आहेत. हा फोटो व्हायरल होताच बडे साहब हा अर्जुन रामपाल असल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये चाहत्यांनी असा दावा केला आहे की अर्जुन रामपालची भूमिका मेजर इक्बालच ‘धुरंधर’मधील बडे साहब आहे. कारण या सीनमध्ये एसपी चौधरी असलम त्याला भेटायला जातो. अनेकजण याच्याशी सहमत आहेत. तर दुसरीकडे दुसरा वर्ग असाही अंदाज व्यक्त करतोय की मेजर इक्बाल यामध्ये बडे साहब असू शकत नाही. कारण तो नेहमीच तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो.

‘धुरंधर’च्या पहिल्या भागात बडे साहबचं नाव अनेकदा नमूद करण्यात आलं होतं, परंतु त्याचा चेहरा कधीच दाखवला नव्हता. ल्यारीसह संपूर्ण पाकिस्तानच्या राजकारणावर त्याचं नियंत्रण असल्याचं कथेत दाखवलं गेलंय. त्याच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाचं नियंत्रणदेखील बडे साहबच करत असतो. त्यामुळे चित्रपटातील हा बडे साहब आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?