AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम चरणच्या आधी बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकर झालेत जुळ्या मुलांचे पालक, शेवटचं नाव चर्चेत

राम चरण आणि उपासना नुकतेच दोन मुलांचे पालक बनले आहेत. त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचं स्वागत केलं आहे.

राम चरणच्या आधी बॉलिवूडमधील 'हे' कलाकर झालेत जुळ्या मुलांचे पालक, शेवटचं नाव चर्चेत
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 01, 2026 | 3:35 PM
Share

Ram Charan : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने आपल्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. राम चरण आणि उपासना कोनिडेला पालक झाले असून, या आनंदाच्या क्षणामुळे ते बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील जुळ्या मुलांचे पालक असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाले आहेत. याआधी प्रीती झिंटा, नयनतारा, करण जोहर, सनी लिओनी, संजय दत्त यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार जुळ्या मुलांचे पालक बनले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पती जीन गुडएनफने नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले होते. या दाम्पत्याने जुळ्या मुलांचे जिया आणि जय यांचे स्वागत केले. सध्या प्रीती झिंटा आपल्या पती आणि मुलांसोबत लाईमलाइटपासून दूर, आनंदी कौटुंबिक आयुष्य जगताना दिसते.

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा हिने दिग्दर्शक विग्नेश शिवन यांच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सप्टेंबर 2022 मध्ये या जोडप्याने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे स्वागत केले. त्यांच्या मुलांची नावे उयिर आणि उलागम अशी असून, नयनतारा आणि विग्नेश सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे क्षण शेअर करत असतात.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर फेब्रुवारी 2017 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा सिंगल बाप झाला. त्याच्या मुलांची नावे यश आणि रूही अशी आहेत. करण जोहरने आपल्या मुलांच्या आईबाबत कोणताही खुलासा केलेला नाही आणि ‘मीच माझ्या मुलांसाठी आई आणि वडील दोन्ही आहे’ असे त्याने यापूर्वी सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना पहिल्या पत्नीपासून त्रिशला दत्त ही मुलगी आहे. त्यानंतर तिसरी पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबत संजय दत्त जुळ्या मुलांचा पिता झाला. 2010 मध्ये या दाम्पत्याने शाहरान आणि इकरा या जुळ्या मुलांचे स्वागत केले. अभिनेता अधूनमधून आपल्या कुटुंबासोबतचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

टॉलिवूड अभिनेता मंचू विष्णु आणि त्याची पत्नी विरानिका रेड्डी यांनी 2011 मध्ये जुळ्या मुली अरियाना आणि विवियाना यांचे स्वागत केले. पुढील काळात त्यांनी आपल्या कुटुंबात आणखी दोन मुलांचा समावेश केला. सध्या हे कुटुंब चार मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचे पती डॅनियल वेबर यांनी आधी एका मुलीला दत्तक घेतले होते. त्यानंतर काही काळातच या जोडप्याने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे स्वागत केले. 2018 साली सनी आणि डॅनियल दोन मुलांचे नोआ आणि एश यांचे पालक बनले. सनी लिओनी अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?