
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 9 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दर सुद्धा इतिसाहात पहिल्यांदाच विना जीएसटी 1 लाख 26 हजारांवर पोहोचले आहेत. दोन्ही धातूमध्ये मोठी उसळी आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांचा खरेदीचा हिरमोड झाला.
9 दिवसात 5 हजारांची वाढ
नव्या दरानुसार, जळगावच्या सराफा बाजारात, सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 13 हजार हजार रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी जीएसटीसह प्रति किलो 1 लाख 29 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात गेल्या 9 दिवसात तब्बल 5 हजार 100 रुपयांनी वाढ झाली आहे. टॅरिफ वॉर आणि भूराजकीय घाडमोडींमुळे सराफा बाजारात दोन्ही धातूनी भरारी घेतली.
सोन्याच्या किंमतीत देशात किती वाढ?
आज 9 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट 1 ग्रॅम सोने दुपारी 136 रुपयांनी वधारले. 1 ग्रॅम सोने 10893 रुपयांहून 11,029 रुपयांवर आले. 10 ग्रॅम सोने 1360 रुपयांनी महागले. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना आता 1,10,290 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट एक ग्रॅम सोने 125 रुपयांनी वधारले. 9,985 रुपयांहून भाव 10,110 रुपयांवर आले. तर 10 ग्रॅम सोने 1250 रुपयांनी महागले. आता हा भाव 1,01,100 रुपयांवर पोहचला. तर 18 कॅरेट सोन्यामध्ये 10 ग्रॅम मागे 1020 रुपयांची वाढ झाली. आता हा भाव 82,720 रुपयांवर पोहचला.
चार मुख्य शहरातील भाव काय?
दिल्लीत 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी 11,073 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,150 रुपये इतका आहे. मुंबईत 24 कॅरेट 1 ग्रम सोन्याचा भाव 11,029 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,110 रुपये इतका आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,073 रुपये तर 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत 10,150 रुपये, कोलकत्तामध्ये 24 कॅरेट 1 ग्रॅम सोने 11,029 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10110 रुपये आहे. टॅरिफ वॉर आणि भूराजकीय घाडमोडींमुळे सराफा बाजारात दोन्ही धातूनी भरारी घेतली. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.