लाखाकडे वाटचाल करणारे सोने घसरणीवर, ट्रम्प यांचा कोणत्या निर्णयाचा सराफ बाजारावर परिणाम

Gold Rate Today : गेल्या तीन ते चार महिन्यांत विक्रमी उच्चांकीवर पोहचलेल्या सोने आणि चांदीचे दर आता घसरु लागले आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीतील सराफ दुकाने गजबजली आहे.

लाखाकडे वाटचाल करणारे सोने घसरणीवर, ट्रम्प यांचा कोणत्या निर्णयाचा सराफ बाजारावर परिणाम
ट्रम्प निर्णयाच्या चर्चेमुळे सोने-चांदी घसरले
| Updated on: Apr 06, 2025 | 1:34 PM

Gold Rate Today : शेअर बाजारात घसरण होत असताना सोने-चांदी गेल्या काही दिवसांपासून महाग होत होते. गेल्या वर्षभरात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत. सोने लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सराफ बाजारावर ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे. सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. तीन दिवसांत 3 हजार 113 रूपयांनी सोने घसरले आहे. चांदीचे दरसुद्धा 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाच्या चर्चेचा परिणाम सराफ बाजारावर झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगावात गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर हे 3 हजार 113 रूपयांनी घसरले आहे. चांदीचे दर हे तब्बल 12 हजार 360 रुपयांनी कमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर जीएसटीसह 94 हजार 863 रुपये होते. तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार 60 रुपये होते. आता जीएसटीसह सोन्याचे दर 91 हजार 670 रुपये तोळे आले आहे. चांदीचे दर 92 हजार 700 रुपये प्रति किलोवर आले आहे. तीन दिवसांत चांदीचे दरही 11 हजार रुपयांनी कमी झाले आहे.

का घसरले सोन्याचे दर

गेल्या तीन ते चार महिन्यांत विक्रमी उच्चांकीवर पोहचलेल्या सोने आणि चांदीचे दर आता घसरु लागले आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीतील सराफ दुकाने गजबजली आहे. अमेरिकेतील ट्रम्प सरकार बिटकॉइन खरेदीच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोने खरेदी करताना लक्षात घ्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करताना गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. हॉलमार्क असलेल्या सोन्यास सरकारची गॅरंटी म्हणता येईल. भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ( बीआयएस) कडून हॉलमार्क दिले जातात. वेगवेगळ्या कॅरेटचे हॉल मार्क अंक वेगवेगळे असतात. ते पाहून तुम्ही सोने घेऊ शकतात.