
Gold Price Review June 2025: जून महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीला नवीन झळाळी मिळाली आहे. या महिन्याभरात सोन्याची किंमत 2103 रुपयांनी वाढली आहे. चांदीने 9624 रुपयांची दरवाढ नोंदवली आहे. चांदीच्या दरवाढीचा दर सोन्यापेक्षा चार पट अधिक आहे. सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचे कारण इराण-इस्त्रायल युद्ध, डॉलरच्या किमतीत घसरण होणे, अमेरिकेतील ट्रेड वॉर आणि व्याजदर, ईटीएफ खरेदीत झालेली वाढ आहे.
आयबीजेएकडून सोने आणि चांदीच्या दराच्या मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी वगळून 95,355 रुपयांवर प्रती 10 ग्रॅम होते. त्याच दिवशी चांदीचे दर 97,458 रुपये प्रती किलो होते. आता महिन्याभरानंतर 30 जून रोजी सोने 95,355 रुपये प्रती 10 ग्रॅमवरुन 97,458 रुपयांवर गेले आहे. म्हणजेच या कालावधीत सोने 2103 रुपये महाग झाले आहे. तसेच महिन्याभरात चांदी 97,458 रुपये प्रती किलोवरुन 1,05,510 रुपये प्रती किलोवर गेली आहे. म्हणजेच चांदीच्या दरात 9,624 रुपयांनी वाढ झाली आहे.
केडिया कमोडिटिजचे अध्यक्ष अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक परिस्थितीमुळे सोने आणि चांदीचे दर वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत कमकुवत आकडेवारी मिळाली आहे. तसेच अमेरिकेतील एडीपी अहवालानुसार नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट होणार आहे. फक्त 37,000 नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. तसेच डॉलरची किंमतही घसरली आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. सोने आणि चांदी या कारणांनी महाग झाले आहे.
सोने चांदीच्या दरात जुलै महिन्याच्या सुरुवातीला घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 96,050 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी झाले. सोमवारी हे दर 97,410 रुपये होते. आज 22 कॅरेट सोने 88,046 रुपये आणि 18 कॅरेट सोने 72,038 रुपयांवर होते. चांदीचे दरही 1,05,990 रुपये प्रती किलो आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,290 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,410 रुपये आहे.