Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे दर

| Updated on: Oct 14, 2020 | 3:07 PM

मंगळवारीही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी घसरले होते. त्यानंतर सलग बुधवारीही सोन्याचा भाव घसरला आहे.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे दर
Follow us on

Gold rate Today 14th October 2020 : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावांत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारीही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी घसरले होते. त्यानंतर सलग बुधवारीही सोन्याचा भाव घसरला आहे. 14 ऑक्टोबरला देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 530 रुपयांनी स्वस्त होत 50,617 झाला आहे. तर चांदीही 1,874 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा वायदा भाव 60,314 वर उघडला. (Gold Price fall by rs 530 know Todays 14th October 2020 gold and sliver price here)

इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या (ibjarates.com) वेबसाइटनुसार, 14 ऑक्टोबर 2020 ला देशभरात सराफा बाजारात सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. दरम्यान, IBJA द्वारा जारी केलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर देशभरात सर्वमान्य आहेत. या वेबसाइटने दिलेल्या सोन्याच्या किंमतींमध्ये जीएसटी (GST) नमूद केलेला नाही. त्यामुळे सोनं खरेदी किंवा विक्री करताना तुम्ही IBJA द्वारे दिलेले भाव दाखवू शकता. इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार ibja देशभरातील 14 सेंटरांना एकत्र करत सोन्या-चांदीचे सरासरी मुल्य दाखवते.

दरम्यान, सोमवारी दिल्ली सराफा बाजारात 240 रुपये प्रति 10 ग्रॅमनं सोनं महागलं होतं. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव वाढून 52,073 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. तर याआधी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,833 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या – 

दोन वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पाहा अपघाताचे भीषण PHOTOS

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF खात्यासाठी सुरू झाली WhatsApp सर्व्हिस


(Gold Price fall by rs 530 know Todays 14th October 2020 gold and sliver price here)