Gold Price| नवीन वर्षात सोने खरेदीची सुवर्णसंधी; भाव झाले अत्यंत कमी!

| Updated on: Dec 30, 2021 | 3:49 PM

नेहमीच्या सर्वोच्च दराच्या तुलने सोने आज दहा ग्रॅममागे जवळपास 8362 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Gold Price| नवीन वर्षात सोने खरेदीची सुवर्णसंधी; भाव झाले अत्यंत कमी!
Gold
Follow us on

नवी दिल्लीः गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी सावध व्हावे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. नवीन वर्षात सोने खरेदी करण्यासाठी अतिशय सुवर्णसंधी आलीय. सध्या सोन्याच्या भावात खूप मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किमती खूपच पडझड झाली. आजही सोन्याचे भाव या महिन्यातील सर्वात स्वस्त असल्याची नोंद झालीय.

8362 रुपयांनी स्वस्त

IBJA नुसार सोन्याच्या दराची सुरुवात आज प्रति दहा ग्रॅममागे 47838 रुपयांनी झाली. त्यात 38 रुपयांची घसरण होत हे भाव बंद झाले. विशेष म्हणजे काल सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम मागे 47876 रुपये नोंदवत बंद झाले होते. नेहमीच्या उच्च दराच्या तुलने सोने आज दहा ग्रॅममागे जवळपास 8362 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजपर्यंतच्या सर्वोच्च सोने दराची नोंद ही ऑगस्ट 2020 मध्ये नोंदवली गेली. त्यादिवशी सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या मागे 56200 रुपये नोंदवले गेले होते.

चांदीमध्येही घसरण

चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दराची सुरुवात सकाळी प्रति किलोमागे 61096 रुपयांनी झाली. काल चांदीचे दर 61588 इतके नोंदवून बंद झाले होते. विशेष म्हणजे आज त्यात 492 रुपयांची पडझड होऊन बाजाराला सुरुवात झालेली दिसली.

MCX वर सोने-चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दर घट झालेली दिसली. सोन्याचा फेब्रुवारी 2022 चा फ्यूचर ट्रेड 148.00 रुपयांच्या घसरणीसह 47691 रुपयांच्या स्तरावर सुरू आहे. तर चांदीचा ट्रेड मार्च 2022 च्या फ्युचर ट्रेडवर 341 रुपयांची घट नोंदवून 61497 रुपये आहे.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता

ISO (Indian Standard Organization) कडून सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतांशे सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. काही जण 18 कॅरेटची खरेदी करतात. मात्र, 24 पेक्षा जास्त कॅरेट नसतात. जितके जास्त कॅरेट सोने तितके शुद्ध असते.

मिस्ड कॉलवर समजेल दर

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट 91 टक्के शुद्ध असते. तर 24 कॅरेट सोने जास्त चमकदार असते. मात्र, त्याचे दागिने बनविले जात नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेट सोने विकतात. आता तुम्हाला सोन्याचे दर चक्क घरी बसून समजू शकतील. त्यासाठी फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला तात्काळ सोन्याच्या दराचा मेसेज येईल.

इतर बातम्याः

Nashik|मुलगा सैन्यात म्हणून सेवानिवृत्त जवानाने गावजेवण दिले; इकडे तोतया लष्करी अधिकाऱ्याने बेरोजगारांसह पत्नीलाही गंडवले

Malegaon riots| 30 तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन; घटनेआधी एकदिवस आरोपींनी मागवल्या, पोलिसही चक्रावले