Malegaon riots| 30 तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन; घटनेआधी एकदिवस आरोपींनी मागवल्या, पोलिसही चक्रावले

मालेगाव दंगलीच्या एक दिवस अगोदर 11 नोव्हेंबर रोजी या तलवारी शहरात आणण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यामागे दंगलीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वसीम अहमद लईक अहमद याचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Malegaon riots| 30 तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन; घटनेआधी एकदिवस आरोपींनी मागवल्या, पोलिसही चक्रावले
Swords found in Malegaon.
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 1:51 PM

नाशिकः मालेगावमधून जप्त केलेल्या 30 तलवारींचे मालेगाव दंगल कनेक्शन उघड झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. दंगलीच्या एक दिवस अगोदर 11 नोव्हेंबर रोजी या तलवारी शहरात आणण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यामागे दंगलीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वसीम अहमद लईक अहमद याचा हात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानेच या तलवारी मागवल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी वसीमला या गुन्हात वर्ग केले आहे. सोबतच दुसरा संशयित वसीम अहमद निहाल याला बेड्या ठोकल्या आहेत. या तलवारी राजस्थानातील अजमेर आणि पुष्करमधून खरेदी केल्या आहेत. आता तलवारीचा नेमका काय वापर करण्यात येणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

5 जणांवर गुन्हे दाखल

मालेगावमधील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरात अपर पोलीस अधीक्षकांनी एका घरावर छापा टाकला. तेव्हा त्यांना एक पोतं भरून तलवारी मिळाल्या. मोहंमद बिलाल याच्या घरी या तलवारी ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मोहंमद बिलासह महेमुद अब्दुल रशीदसह अजून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.एकूण 20 हजार रुपये या किमतीच्या 30 तलवारी आहेत. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घुसर, हवालदार शेखर ठाकूर, पंकज डोंगरे, विशाल गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सावंत, रामेश्वर घुगे, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार, संदीप राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली होती.

पोलिसांचा शोध सुरू

त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करून दंगल पेटवण्यात आली. त्यामुळे राज्यात अमरावती आणि नांदेडही पेटले. या हिंसाचारात मालेगावमध्ये अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. एकंदर मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. आता या तलवारी दंगलीच्या अगोदर एक दिवस कशासाठी शहरात आणल्या होत्या, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

इतर बातम्याः

Nashik|मुलगा सैन्यात म्हणून सेवानिवृत्त जवानाने गावजेवण दिले; इकडे तोतया लष्करी अधिकाऱ्याने बेरोजगारांसह पत्नीलाही गंडवले

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पक्षांतराच्या उलथापालथी…माजी महापौर दशरथ पाटलांचे पुत्र शिवसेनेत

आरोग्य, पर्यावरण मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त जागे; अखेर नवे निर्बंध लागू, जाणून घ्या नियम…

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.