AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Night Curfew|आरोग्य, पर्यावरण मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त जागे; अखेर नवे निर्बंध लागू, जाणून घ्या नियम…

खरे तर नवे निर्बंध 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात तात्काळ हे आदेश आहेत तसे लागू केले. मात्र, नाशिक शहरात हे आदेश लागू करण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कसलीही कार्यवाही केली नव्हती.

Nashik Night Curfew|आरोग्य, पर्यावरण मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त जागे; अखेर नवे निर्बंध लागू, जाणून घ्या नियम...
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 2:45 PM
Share

नाशिकः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचा दिलेला इशारा आणि पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असा दिलेला इशारा त्यानंतर नाशिकमध्ये पोलीस आयुक्त जागे झाले असून, त्यांनी नवे नियम आणि रात्रीची संचारबंदी लागू करायच्या सूचना दिल्या आहेत. खरे तर याबाबतचे नवे निर्बंध 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तात्काळ हे निर्बंध आहेत तसे लागू केले. मात्र, नाशिक शहरात हे निर्बंध लागू करण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कसलीही कार्यवाही केली नव्हती. त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले जात होते. मात्र, अखेर उशिरा का होईना, हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पार्ट्यांना राहणार बंदी

नव्या नियमानुसार आता सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. त्यामुळे नवर्षाच्या पार्ट्या या होणार नाहीत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

कार्यक्रम उपस्थितीत घट

सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. या दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल.

क्रीडा स्पर्धेत 25 टक्के उपस्थिती

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

चित्रपटगृहात 50 टक्के उपस्थिती

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

इतर बातम्याः

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.