Gold Rate : 3 महिन्यांत सोन्यामुळे खरेदीदारांची बल्ले बल्ले, चांदीमुळे गुंतवणूकदारांची चांदी

| Updated on: Dec 24, 2022 | 4:38 PM

Gold Rate : 3 महिन्यांत सोन्या-चांदीत जोरदार परतावा मिळाला आहे.

Gold Rate : 3 महिन्यांत सोन्यामुळे खरेदीदारांची बल्ले बल्ले, चांदीमुळे गुंतवणूकदारांची चांदी
सोने-चांदीने मालामाल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : सोन्या-चांदीतील गुंतवणुकीने (Gold Investors) खरेदीदारांची अवघ्या तीन महिन्यात बल्ले बल्ले झाली. परंपरागत गुंतवणूकदारांना सोन्या-चांदीतील वाढत्या किंमतीमुळे (Gold And Silver Price) जोरदार परतावा मिळाला. अवघ्या तीन महिन्यात त्यांना मोठा परतावा मिळाला आहे. 26 सप्टेंबर रोजी सोने खरेदी करणाऱ्यांना आतापर्यंत सोन्यातील गुंतवणुकीमुळे प्रति 10 ग्रॅम 5,000 रुपयांचा फायदा झाला आहे. तर चांदीतील गुंतवणूकदारांची चांदी झाली. त्यांना प्रति किलोग्रॅम मागे 12,600 रुपयांचा फायदा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीची घौडदौड कायम राहील.

IIFL चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार, कोविडचे भूत पुन्हा मानगुटीवर बसण्याच्या भितीने शेअर बाजारातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातील अनेकांनी सोन्या-चांदीतील गुंतवणुकीकडे मोर्चा वळविला आहे. डॉलर निर्देशांकाची घसरण आणि मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती.

तज्ज्ञांच्या मते, ही भीती कायम राहिल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोनाची दहशत कायम राहिल्यास गुंतवणूकदार मालामाल होतील. येत्या काही दिवसात सोन्या-चांदीचे दर आणखी भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार सोने-चांदीच्या किंमती कमी-जास्त होतात.

हे सुद्धा वाचा

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

  1. 30 नोव्हेंबर रोजी चांदीचा सोन्याचा भाव 52,931 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  2. 23 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 54,574 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांचा प्रति 10 ग्रॅम 1,643 रुपयांचा फायदा
  4. 26 सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 49,621 रुपये होता
  5. 3 महिन्यांत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 4,953 रुपयांचा फायदा झाला

 

 

  1. 30 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 63,461 रुपये प्रति किलोग्रॅम होता
  2. 23 डिसेंबर रोजी चांदीची किंमत 69,033 रुपये प्रति किलोग्रॅम होता
  3. डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांना एका किलोमागे 5,572 रुपयांचा फायदा झाला
  4. 26 सप्टेंबर रोजी चांदीचा दर प्रति किलो 56,440 रुपये होता
  5. 3 महिन्यांत चांदीने गुंतवणूकदारांना किलोमागे 12,593 रुपयांचा फायदा मिळवून दिला.