Gold Price: या देशात दूध आणि ब्रेडपेक्षा सोने स्वस्त! 15 ग्रॅमची किंमत तर…
Gold Price Today: या देशात दूध आणि ब्रेडपेक्षा सोन्याचा भाव स्वस्त आहे. सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना या देशात सोने इतके स्वस्त कसे असा प्रश्न जगाला पडला आहे. कोणता आहे हा देश, का आहे सोने आणि चांदी इतके स्वस्त?

Gold Price in Venezuela : आज भारतात सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. जगातील अनेक देशातही सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पण या देशात दूध आणि ब्रेडपेक्षाही सोने स्वस्त आहे. व्हेनेझुएला ( Venezuela) या देशात सोन्यात मोठी स्वस्ताई आली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी अधिक पैसा मोजावा लागत आहे. पण सोने मात्र स्वस्तात मिळत आहे. 2026 च्या सुरुवातीला व्हेनेझुएलामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत भारतीय चलनात जवळपास 181 ते 200 रुपये इतकी होती. म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची किंमत
2000 रुपयांपेक्षा कमी होती. भारतात सोने खरेदी ही एक मोठी गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे व्हेनेझुएलामधील सोन्याची किंमत अनेकांसाठी धक्का देणारी आहे. सोन्याची ही स्वस्ताई अनेकांना जगाच्या नकाशावर हा देश कुठे आहे हे शोधायला मजबूर करत आहे. पण त्यामागे एक मोठ्या आर्थिक संकटाची छाप आहे.
भारतात सोने इतका महाग तरी का?
देशात सोन्याच्या किंमतींनी ग्राहक हैराण आहेत. गेल्या दोन वर्षांत सोन्याने कधी लाखाचा टप्पा पार करून दोन लाखांचा टप्पा गाठला हे जनतेला कळले नाही. सध्याची सोन्याची किंमत जवळपास 13,800 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहचली आहे. भारतात सोन्याला खास महत्त्व आहे. सोने हे परंपरेचा भाग आहे. लग्नकार्यात, अनेक समारंभात त्याचा खास वापर होतो. त्यामुळे सोन्याची मागणी अधिक आहे.
व्हेनेझुएलात दूध, ब्रेड आणि अंडे का महाग?
व्हेनेझुएलात महागाईने कळस गाठला आहे. दैनंदिन वस्तू आणि अन्न पदार्थ महागले आहेत. एक लिटर दुधाचा भाव जवळपास 175 रुपये इतका आहे. तर ब्रेडचे एक पॅकेट जवळपास 170 रुपयांना आहे. तर एक डझन अंड्याची किंमत 233 रुपयांपर्यंत पोहचली आहे.
मग सोने इतके स्वस्त कसे?
व्हेनेझुएलात सर्व वस्तू महाग होत असताना सोने इतके स्वस्त कसे असा सवाल अनेकांना पडला आहे. त्यामागे या देशाचे चलन बोलिवर (Bolivar) ची मूल्य घसरण हे मानले जात आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकन संघर्ष आणि अंतर्गत कलह यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महागाईत मोठी वाढ झाली आहे. जेव्हा एखाद्या देशाचे चलन कमकुवत होते. तेव्हा त्याचे मूल कमी होते. व्हेनेझुएला नेमके हेच घडत आहे. बोलिवरची किंमत एकदम तळाशी पोहचली आहे. त्यामुळे या देशात सोने स्वस्त झाले आहे.
कुठे आहे व्हेनेझुएला?
व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील एक खास देश आहे. जगातील कच्चे इंधनाचा साठा असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या देशांपैकी हा एक देश आहे. तर या देशातील Orinoco Mining Arc या क्षेत्रात हजारो टन सोन्याचा साठा असल्याचा दावा करण्यात येतो. तरीही मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार, चुकीची धोरणं, आर्थिक संकट यामुळे या देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीतून जात आहे. येथील लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. एका वृत्तानुसार, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती Nicolás Maduro यांनी त्यांच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने देशाबाहेर पाठवले होते. 2013 ते 2016 या दरम्यान या देशाने जवळपास 113 मॅट्रिक टन सोने स्वित्झर्लंडमध्ये पाठवले.