Gold Price Today : मजबूत मागणीमुळे सोनं-चांदीला पुन्हा झळाली, आजचे भाव किती ?
Gold Rate Today 12 August 2026 Latest News Updates in Marathi : सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीचे दर वाढले आहेत. देशातील 10 प्रमुख शहरांत 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याच्या किमती किती ते जाणून घेऊया..

Gold Rate Today in India : कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरांना पुन्हा आधार मिळताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले असले तरी आज राजधानी दिल्लीसह अनेक बाजारांमध्ये सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली असून, अवघ्या दोन दिवसांत तिच्या दरात तब्बल 10,100 प्रति किलोची वाढ झाली आहे. सोन्याच्या दराचा मागील काही दिवसांचा प्रवास पाहिला तर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाल्याचे दिसून येते. एका दिवसाच्या घसरणीनंतर सलग दोन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव एकूण 1,860 रुपयांनी कमी झाला. त्याच काळात 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1710 रुपयांची घसरण झाली.
मात्र, याआधी सोन्याने जोरदार तेजी नोंदवली होती. 9 ऑगस्टच्या एका दिवसाच्या स्थिरतेपूर्वी सलग चार दिवसांत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल 8,350 रुपयांची वाढ झाली होती. याच कालावधीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,650 ने महागला होता. यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली. त्या दिवशी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 380 आणि 22 कॅरेट सोने 350 रुपयांनी स्वस्त झालं. मात्र, आज बाजारात पुन्हा खरेदीचा कल दिसून आला असून, दिल्लीमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील प्रमुख शहरामधील सोन्याचे भाव
सोन्याचा दर प्रत्येक शहरात स्थानिक कर, मागणी, पुरवठा, दागिने बाजारातील परिस्थिती आणि इतर घटकांमुळे काही प्रमाणात वेगळा असू शकतो. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताज्या दराची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या…
| शहर | 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर | 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर |
| दिल्ली | ₹1,53,980 | ₹1,41,160 | ₹1,15,530 |
| मुंबई | ₹1,53,830 | ₹1,41,010 | ₹1,15,380 |
| कोलकाता | ₹1,53,830 | ₹1,41,010 | ₹1,15,380 |
| चेन्नई | ₹1,54,380 | ₹1,41,510 | ₹1,19,310 |
| बंगळुरू | ₹1,53,830 | ₹1,41,010 | ₹1,15,380 |
| हैदराबाद | ₹1,53,830 | ₹1,41,010 | ₹1,15,380 |
| लखनऊ | ₹1,53,980 | ₹1,41,160 | ₹1,15,530 |
| पाटणा | ₹1,53,880 | ₹1,41,060 | ₹1,15,430 |
| जयपुर | ₹1,53,980 | ₹1,41,160 | ₹1,15,530 |
| अहमदाबाद | ₹1,53,880 | ₹1,41,060 | ₹1,15,430 |
चांदीच्या दरातही जोरदार तेजी
सोन्यासोबतच चांदीच्या बाजारातही तेजी कायम आहे. सलग तीन दिवस चांदीचे दर स्थिर राहिल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी तिच्या भावात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील दोन दिवसांतच एक किलो चांदी तब्बल 10,100 रुपयांनी महागली आहे. यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. आज दिल्लीत एक किलो चांदी 100 रुपयांनी महागली असून त्याचे दर प्रति किलो 2,55,100 रुपये आहेत. इतर प्रमुख महानगरांचा विचार केल्यास मुंबई आणि कोलकाता येथेही चांदीचा भाव याच पातळीवर आहे. मात्र, चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा भाव सर्वाधिक असून तिथे 2,60,100 रुपयांना चांदी मिळत आहे.
अमेरिकेतील महागाईचा डेटा जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होत आहेत, त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे, असं लेमन मार्केट डेस्कचे रिसर्च हेड गौरव गर्ग यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये गुंतवणुकीची तसेच औद्योगिक मागणीची स्थितीही मजबूत आहे.