Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव

| Updated on: Dec 08, 2021 | 5:12 PM

आपल्याला सोन्याची शुद्धता (Check Purity of Gold) तपासायची असल्यास सरकारनं एक अॅप बनवलंय. ‘BIS Care App’ हे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देते. या अॅपच्या माध्यमातून फक्त सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तुम्हाला तक्रारही करता येणार आहे. या अॅपमध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात.

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव
gold rates
Follow us on

नवी दिल्लीः सोन्याच्या भावात बुधवारी तेजी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात (Gold Price in Delhi) 8 डिसेंबरला सोन्याच्या किमतीत उसळी नोंदवली गेलीय. सोन्याच्या दरात आज 177 रुपये तेजी पाहायला मिळाली, तर चांदीच्या किमती (Silver Price in Delhi) 1112 रुपये प्रति किलोग्राम घसरण झालीय.

सोन्याचा भाव कसा तपासाल?

आपण घर बसल्या सोन्याचे भाव (Know how to check Gold Rates) तपासू शकता. फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.

कशी तपासाल सोन्याची शुद्धता?

आपल्याला सोन्याची शुद्धता (Check Purity of Gold) तपासायची असल्यास सरकारनं एक अॅप बनवलंय. ‘BIS Care App’ हे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देते. या अॅपच्या माध्यमातून फक्त सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तुम्हाला तक्रारही करता येणार आहे. या अॅपमध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात. या अॅपद्वारे ग्राहकांना तात्काळ तक्रार करण्याची सुविधा आणि माहिती मिळते.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण

या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्यापूर्वीचा शेवटचा आठवडा सोन्याच्या घसरणीचा आठवडा होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान सोने प्रति 10 ग्रॅम 574 रुपयांनी आणि चांदी प्रति किलो 2200 रुपयांनी स्वस्त झाली. म्हणजेच दोन दिवसांच्या वाढीनंतरही सोने पुन्हा स्वस्त झाले. चांदी अजूनही 29 नोव्हेंबरच्या पातळीच्या खाली आहे.

ओमिक्रॉनची भीती वाढल्यास सोने आणि चांदी अधिक महाग

बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.

संबंधित बातम्या

Paytm कडून विमानाच्या तिकिटावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायदा कसा घ्याल?

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ