Paytm कडून विमानाच्या तिकिटावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायदा कसा घ्याल?

पेटीएम अॅप वापरकर्त्यांना फ्लाईट, आंतर शहर बस आणि रेल्वे तिकीट बुक करण्यास सक्षम करते. कंपनीची सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांशी भागीदारी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (IATA) मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट आहे. त्याची 2,000 हून अधिक बस ऑपरेटर्सशी थेट भागीदारी आहे.

Paytm कडून विमानाच्या तिकिटावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायदा कसा घ्याल?
ऑनलाइन पेमेंट प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्लीः भारतातील अग्रगण्य डिजिटल इकोसिस्टम असलेली पेटीएम आज सशस्त्र दलातील कर्मचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लाइट बुकिंग तिकिटावर विशेष सूट देत आहे. इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट आणि एअरएशियावरील बुकिंगवर या सवलती उपलब्ध असतील. त्यांना विमान तिकिटाच्या भाड्यात 15 ते 50 टक्के सूट मिळेल. यासोबतच विद्यार्थ्यांना 10 किलोपर्यंतच्या अतिरिक्त सामानाचाही लाभ मिळणार आहे.

बँकिंग सेवा प्रदात्यांच्या आधीच अस्तित्वात असलेल्या ऑफरच्या व्यतिरिक्त असतील

सामान्य लोकांच्या तुलनेत भाड्यात मोठी सवलत मिळेल आणि या सवलती पेटीएम आणि बँकिंग सेवा प्रदात्यांच्या आधीच अस्तित्वात असलेल्या ऑफरच्या व्यतिरिक्त असतील. पेटीएम वापरकर्ते त्यांचे तपशील टाकल्यानंतर फ्लाइट पर्याय शोधू शकतात आणि लागू झालेली सवलत आणि ऑफर पाहू शकतात. पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ट्रॅव्हल तिकीट हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे आणि आमच्या वापरकर्त्यांसाठी बुकिंग सुलभ करण्याचा आणि त्यांच्या प्रवासाची अधिक किफायतशीर पद्धतीने योजण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या एअरलाईन भागीदारांसह आम्ही सशस्त्र दल वापरकर्ते, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे करण्यास सक्षम आहोत.

पेटीएम अॅपद्वारे तिकीट बुक करा

पेटीएम अॅप वापरकर्त्यांना फ्लाईट, आंतर शहर बस आणि रेल्वे तिकीट बुक करण्यास सक्षम करते. कंपनीची सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांशी भागीदारी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (IATA) मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट आहे. त्याची 2,000 हून अधिक बस ऑपरेटर्सशी थेट भागीदारी आहे. कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी ट्रॅव्हल तिकीट व्हर्टिकलमध्ये नवीन उत्पादने लॉन्च केलीत. जसे की, जवळच्या विमानतळ वैशिष्ट्य, फ्लाईट प्रवासासाठी ईएमआय आधारित कर्ज, पीएनआर खातरजमा स्थिती आणि ट्रेन प्रवासासाठी थेट धावण्याची स्थिती तसेच बसमधील संपर्करहित तिकिटे यांचा समावेश आहे.

सर्व कामे एकाच कार्डाने होणार

अलीकडेच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने पेटीएम ट्रान्झिट कार्ड लाँच केले. हे कार्ड वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजांची काळजी घेईल. मेट्रो, रेल्वे, राज्य सरकारी बस सेवांप्रमाणेच, ऑफलाईन व्यापारी स्टोअरमध्ये भरण्यासाठी टोल आणि पार्किंग शुल्क, ऑनलाईन खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. एवढेच नाही तर या कार्डद्वारे तुम्ही एटीएममधून पैसेही काढू शकता. पेटीएम ट्रान्झिट कार्ड दररोज मेट्रो/बस/ट्रेन सेवा वापरणाऱ्या आणि अखंड कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेणाऱ्या 50 लाख प्रवाशांना मदत करेल. हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या सहकार्याने पेटीएम ट्रान्झिट कार्ड रोलआउट सुरू करण्यात आलेय. हैदराबादमधील वापरकर्ते आता ट्रांझिट कार्ड खरेदी करू शकतात, जे प्रवासासाठी स्वयंचलित भाडे संकलन गेटवर प्रदर्शित केले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

घर नको पण अटी आवर; साधा पंखा असला तरी मिळणार नाही ‘पंतप्रधान आवास’चा लाभ

आता नोकरी सोडतानाही बसणार आर्थिक फटका; … तर तुमच्या वेतनावर लागणार जीएसटी

Published On - 4:44 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI